Share

अश्लील कृत्य केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, तक्रारदार मुलगी म्हणाली…

मल्याळम चित्रपट अभिनेता श्रीजीथ रवीला दोन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पॉस्को कायद्याच्या अंतर्गत मल्याळम चित्रपट अभिनेता श्रीजीथ रवीवर(Shrijith Ravi) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी अभिनेता श्रीजीथ रवी विरोधात तक्रार नोंदवली होती.(Famous actor shrijith ravi arrested)

त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी त्रिशूरमधील एका उद्यानात दोन अल्पवयीन मुली बसल्या होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने या दोन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य केले.

यानंतर मुलींच्या पालकांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी उद्यान परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत कारचा शोध घेतला. पोलीस तपासादरम्यान ही कार अभिनेता सृजित रवीची असल्याचे स्पष्ट झाले.

यासंदर्भात माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदार मुलींनी आरोपीला ओळखले असून या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सृजित रवीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याच्यावर पॉक्सोच्या कलम ११(१) आणि १२ सह विविध कलमांखाली श्रीजीथवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाची बाब म्हणजे २०१६ मध्येही अभिनेता ला पॉक्सो कलमाखाली अटक करण्यात आली होती. पण त्यावेळी पोलिसांनी अभिनेता श्रीजीथवरगुन्हा दाखल करून त्याला सोडून दिले होते. ४६ वर्षीय श्रीजीथ व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याच्याकडे मॅनेजमेंटची पदवी देखील आहे.

२००५ साली श्रीजीथ रवीने मल्याळम चित्रपटसृष्टीत ‘मायाखुम्म या चित्रपटाद्वारे मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये श्रीजीथ रवीने भूमिका केल्या आहेत. २०१३ साली श्रीजीथ रवीला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या :-
‘मेलेल्या आईचे दुध पिऊन सत्तेत गेलात का?’; ‘त्या’ घटनेनंतर अभिनेत्रीचा बंडखोर आमदारांवर निशाणा
ठाकरे – शिंदे गट पुन्हा एकत्र येणार? आमदार खासदारांसह ‘या’ नेत्यांचे प्रयत्न सुरू, वाचा ईनसाईड स्टोरी
आजोबांचा स्वँग; वयाच्या पंच्याहत्तरीत निघाले बाईकवरून अमरनाथ यात्रेला

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now