कतारची राजधानी दोहा येथे विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी फुटबॉल चाहते जमले आहेत. या विश्वचषकादरम्यान ब्राझीलमधील एका कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या बातम्याही येत आहेत. ब्राझीलमधील सहा जण असलेल्या एका कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारला असून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना खूप अभिमान आहे. या कुटुंबात आई-वडील आणि चार मुलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
त्यांनी मौलवीसमोर धर्म स्वीकारला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने इस्लामचा प्रचार केल्याचा आरोप कतारवर होत आहे. आधी मेक्सिकन आणि आता ब्राझिलियन कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारल्याची कबुली दिल्याने सर्व बातम्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
आईशिवाय तिच्या तीन मुलींनी बुरखा परिधान केला होता आणि व्हिडिओमध्ये खूप आनंदी दिसत. नुकतीच एक बातमी आली होती, ज्यामध्ये कतारमध्ये वर्ल्ड कपच्या निमित्ताने इस्लामचा कसा प्रचार केला जात आहे, असे सांगण्यात आले होते. मौलवीने इस्लाम स्वीकारल्यानंतर आईला तिच्या भावनांबद्दल विचारले.
यावर त्यांचे उत्तर होते, ‘माझा आनंद कसा व्यक्त करावा हेच कळत नाही. ते सांगनही ही खूप अवघड आहे कारण ते माझ्या हृदयाला भिडले आहे. यानंतर मौलवींनी मुलीला विचारले, ‘तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी कोणी जबरदस्ती केली आहे का?’ तिचे उत्तर नाही असे होते आणि ती म्हणाली की तिने हा धर्म कोणीतरी सांगितल्यामुळे किंवा धमकावल्यामुळे निवडला नाही, तर तो स्वतःचा निर्णय होता.
या ब्राझीलच्या कुटुंबापूर्वी एका मेक्सिकन कुटुंबानेही इस्लाम धर्म स्वीकारला होता. कतारच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाकडून कतार सांस्कृतिक गाव मशीद बनवली जिला दोहा येथे स्थापन केले आहे, आणि तो अश्या वर्ल्ड कप चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे की ज्यांना इस्लामबद्दल जाणून घ्यायचे आहे. इस्लामबद्दलचे इलेक्ट्रॉनिक फलक ३० भाषांमध्ये लावण्यात आले आहेत. हे फलक एंट्री गेटवर विजिटर्स फोनवरून पाहू शकतील अशा पद्धतीने लावण्यात आले आहेत.
https://twitter.com/ArianaNews_/status/1595460762645970949?s=20&t=5jOMJyg87trkuMKYSuQ64w
यासोबतच विविध भाषांमध्ये इस्लामविषयी माहिती देणार्या पुस्तिकाही छापण्यात आल्या असून त्या लोकांमध्ये वाटल्या जात आहेत. मंडप तयार करण्यात आला आहे. फुटबॉल विश्वचषकादरम्यान लोकांना इस्लाम आणि त्याच्या शिकवणींबद्दल माहिती देणे हा या पॅव्हेलियनचा उद्देश आहे. विश्वचषकादरम्यान पैगंबर मुहम्मद यांचे शब्द, कृती आणि सवयींबद्दल वर्ल्ड कप चाहत्यांना सांगितले जात आहे. रस्त्यांच्या कडेला भिंतींवर या गोष्टी लिहिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
sasun : “मी जगलो काय अन् मेलो काय फरक पडत नाही, डॉक्टरसाहेब माझी किडनी घ्या अन् मला दीड लाख द्या”
पुरूषांनो सावधान! महीलांकडे फक्त १४ सेकंद जरी पाहीले तरी होणार तुरूंगवासाची शिक्षा
नुसती ताडतोड! ‘या’ फलंदाजाने फक्त 33 चेंडूत हादरवली दुबई, गोलंदाजांची कत्तल; पहा व्हिडीओ..