शहीद जवानाच्या कुटुंबासाठी गावाने दाखवली कृतज्ञता; एका रात्रीत उभे केले १ लाख ९१ हजार

भारत मातेची सेवा सैनिक अहोरात्र करत असतात. भारत मातेची सेवा करताना सैनिक देशासाठी शहीद होतात. भारत मातेच्या शूर जवानांबद्दल सामान्य नागरिकांना पण अभिमान असतो हे पण वेळोवेळी दिसून आले आहे.

देशवासियांना मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल किती अभिमान असतो हे एका कृतीतून दिसून आले आहे. याचे उदाहरण काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे पाहायला मिळाले आहे.

कडेपठार गावातील जावं विजय पोंदकले याना देशसेवा करताना काश्मीर मध्ये वीरमरण आले. ही बातमी जेव्हा गावाकडे कळली तेव्हा सगळ्या गावावर शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने सगळ्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.

शहीद जवान पोंदकले यांच्या घराची परिस्थिती पण हलाखीची आहे. त्यांचे सगळे कुटुंब एका खोलीत राहते. त्यांच्या मागे कुटुंबात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्या समावेश आहे.

त्यामुळे या घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त न करता पर्वणी मिळून काहीतरी ठोस उपाय करण्याचे ठरविले. गावकरी आणि सोशल मीडियातील मित्र मंडळी या निमित्त एकत्र आली. त्यामध्ये गावाचे सुपुत्र डॉ. अतुल पिसाळ यांनी पुढाकार घेतला .

डॉ अतुल पिसाळ आणि त्यांच्या मित्रांनी शाहिद जवानाच्या कुटुंबासाठी मदतनिधी उभे करण्याचे ठरविले आणि त्या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली. मित्रांच्या आणि गावकऱ्यांच्या प्रतिसादाला चांगली साथ मिळाली आणि १ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम उभी राहिली.

ही रक्कम जमा झाल्यावर शाहिद जवानांच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावावर ती बँकेत ठेवली गेली. डॉ. अतुल पिसाळ यांनी दातृत्वाचे अनोखे उदाहरण देताना संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर मोफत उपचार करण्याचे जाहीर केले. जवानाच्या कुटुंबीयांनी झालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची परिस्थिती बिकट; ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाने गाठली मुंबई

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडच ‘लॉकडाऊन लग्न’, म्हणतेय ही तर नवीन सुरवात..

कोरोना असतानाही खतरों के खिलाड़ी ११ येणार आपल्या भेटीला; ‘या’ देशात सुरू आहे शुटींग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.