पळून जाणाऱ्या जोडप्याला कुटुंबियांनी पकडलं, गळ्यात टायर घालून भरचौकात नाचवलं; पहा व्हिडिओ

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी गळ्यात टायर घेऊन नाचताना दिसत आहे. तर एक व्यक्ती त्यांना काठीने मारताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक १९ वर्षीय तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून जाणार होती. पण त्याआधीच गावकडील लोकांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यांना पकडले असून त्यांच्या गळ्यात टायर लावून त्यांना नाचण्याची शिक्षा दिली आहे.

या तरुणीला तिच्या लहान बहिणीने पळून जाण्यास मदत केली होती. जेव्हा दोघांना पकडण्यात आले तेव्हा मुलीच्या कुटुंबाने दोघांना जाब विचारला. तेव्हा दोघांनीही सर्व घटनेची कबूली दिली आहे. त्यामुळे पळून जाणाच्या प्रयत्नात असलेल्या जोडप्यासह १४ वर्षाच्या लहान मुलीलाही शिक्षा देण्यात आली आहे.

मुलीच्या कुटुंबियांनी दोघी मुलींच्या आणि मुलाच्या गळ्यात टायर टाकले. त्यानंतर स्पिकर लावून तिथे गाणे लावले. यावेळी मुलीच्या कुटुंबियांनी तरुणाला काठीने मारहाण देखील केली आहे.

तिथल्या काही गावकऱ्यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये कैद करुन घेतला आहे. त्यानंतर कोणीतरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांच्या नजरेत हा व्हिडिओ पडताच त्यांनी मुलीच्या कुटुंबियांवर कारवाई केली आहे.

या घटनेप्रकरणी लहान बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीचे वडिल, तिचा भाऊ आणि इतर नातेवाईक अशा चार जणांना अटक केली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या शिक्षेमुळे सोशल मीडियावर त्या कुटुंबाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

महानायक अमिताभ बच्चन झाले मराठमोळ्या काॅमेडीकिंग समीर चौगुले समोर नतमस्तक
सलमान खानच्या ‘शेरा’ला तर सगळेच ओळखतात पण या व्हिडीओनंतर फेमस झाला राज कुंद्राचा बॉडीगार्ड
मुंबई पोलीसांनो माझी माफी मागा, नाहीतर..; किरीट सोमय्यांची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.