रोड अपघातात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. चूक कोणाचीही असली तरी अपघात आणि मृत्यूचे आकडे यांची सरशीच सुरू असते. याच अपघातामध्ये कोणी आपले आई-वडील, भाऊ किंवा बहीण कोणी ना कोणी गमावले आहे.
अशीच एक हृदय पिळवणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये घडली आहे. एका अपघातात एक संपूर्ण कुटुंबच संपलं आहे. आपल्याच मुली-जावई आणि दोन नातवांना एकाच सरणावर अग्नी देण्याची वेळ आली. गावात येतांना या चौघांचा हा अपघात झाला.कोकण येथील गुहागर तालुक्यातील हेदवी या गावात आजीच्या वर्षश्राद्धसाठी निघाले होते.
मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव रोपोली येथे झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पंडित कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं असा सगळा परिवारच मृत्यूमुखी पडला. या चारही जणांना एकाचवेळी अग्निडाग देण्याची वेळ आली.
रघुनाथ जाधव यांच्या कुटुंबावर ही दुर्दैवी अशी घटना काळाने ओढावून आणली आहे. यावेळी कुटुंबियांसोबतच उपस्थित मंडळींनिही हंबरडा फोडला, हे दृश्य हृदय पिळवून टाकणारे होते. रघुनाथ जाधव यांची मुलगी, जावई, आणि नातवंडांच्या सरणावर अग्नीडाग त्यांनी तसेच त्यांच्या मुलाने दिला.
हेदवी येथील जुजेवाडी येथे मनोहर जाधव यांच्या आईचे श्राद्ध होते. गुरुवारी रात्री जाधव आणि पंडित कुटुंब मुंबईवरून यायला निघाले असता हा अपघात झाला. शुक्रवारी पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. निलेश पंडित(वय ४५) पत्नी नंदिनी(वय ३५), मुलगी मुद्रा(वय १२) आणि मुलगा रुद्र(वय ४) असे पंडित परिवारातील सदस्यांचे नावे आहेत.
स्मशानात दोनच शवदहीन्या असल्यामुळे या चारही जणांच्या मृतदेहाला एकाच वेळी सरणावर अग्नीडाग देण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. रघुनाथ जाधव यांच्यावर त्यांच्याच मुलीच्या संपूर्ण कुटुंबाला अग्नी डाग देण्याची वाईट वेळ आली. यावेळी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. अपघात अजून किती कुटुंबांचे प्राण घेणार, मुंबई गोवा महामार्गावर असे अनेक अपघात यापूर्वीही झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
ज्याने आजवर गाडीतून पेशंटला नेत शेकडो गावकऱ्यांचे प्राण वाचवले त्याचाच अपघातात मृत्यू
समृद्धी ठरतोय मृत्यूचा महामार्ग! भीषण अपघातात बसचा चक्काचूर; पाहून अंगावर काटा येईल
जागच्या जागी मुंबईतील १० जणांचं कुटूंब संपलं; अपघाताची भीषणता वाचून अंगावर काटा येईल