देशात आजही काही कुटुंब प्रेमविवाहला मान्यता देत नाही. त्यामुळे अनेक धक्कादायक घटना सुद्धा घडताना दिसून येतात. काहीजण पळून लग्न करतात, तर काही तरुण-तरुणी आपला जीवही देतात. पण आता गुजरातमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे.
गुजरातच्या तापीमध्ये एका प्रेमी जोडप्याला लग्न करायचे होते. पण कुटुंब त्यांना परवानगी देत नसल्यामुळे अखेर त्यांनी आपले जीवन संपवले. पण आता दोघांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या पुतळ्यांचे लग्न लावले आहे.
दोघांच्या मृत्यूनंतर कुटुंबांनी त्यांचे पुतळे तयार केले. त्यानंतर त्यांची वरात काढत आणि सप्तपदी पुर्ण करत त्यांचे लग्न लावून दिले. कुटुंबियांनी पुतळ्यांच्या साथीने लग्नातील सर्व विधी पुर्ण केले. त्यामुळे या लग्नाची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
नेवाला गावात राहत असलेल्या गणेश आणि रंजनाचे प्रेमसंबंध होते. त्यांना लग्न करायचं होतं. ऑगस्टमध्ये २०२२ मध्ये त्यांनी लग्न केलं आणि गणेश रंजनाला घरी घेऊन आला. पण कुटुंबाने त्यांचं लग्न स्वीकारलं नाही. मुलीच्या कुटुंबाकडूनही या लग्नाला विरोध होता.
दोन्ही कुटुंबांनी त्यांना घरातून हाकलून दिलं. त्यामुळे त्यांनी जीवन संपवले. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम होते. त्यामुळे दोघांनी एकाचवेळी जीव देत जगाचा निरोप घेतला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला. दोघांच्या मृत्यूनंतर त्यांचे डोळे उघडले.
मुलगा मुलगी आता या जगात नाही, पण त्यांना शांती मिळाली पाहिजे. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांनी दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी दोघांचे पुतळे तयार केले आणि त्यांचे लग्न लावून दिले आहे. गणेश आमच्या लांबच्या नात्यातला होता, त्यामुळे आम्ही लग्नाला विरोध करत होतो. पण आता त्यांना शांती मिळण्यासाठी आम्ही त्यांच्या पुतळ्यांचे लग्न लावून देत आहोत, असे रंजनाच्या आजोबांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानकडे आहे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा, एका झटक्यात बदलेल देशाचे नशीब
…तर एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार आणि सरकार कोसळणार; घटनातज्ञांनी सांगीतले कारण
‘पठाण’च्या विरोधा दरम्यान करीनाने सोडले मौन; बायकाॅट बाॅलीवूडवाल्यांना झाप झाप झापले