शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; म्हणाला…

मुंबई | मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी सुरू आहे.  शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा करत एका संशयित व्यक्तीला आंदोलकांनी पकडून माध्यमांसमोर आणले होते.

मात्र, त्याच व्यक्तीचा नवा व्हिडीओ समोर आला असून, शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे माध्यमांशी बोललो, असा यू-टर्न आरोपीने घेतला आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकरी नेत्यांच्या हत्या करण्याचे कारस्थान रचल्याची कबुली योगेश नामक तरुणाने दिली होती.

योगेशने सांगितले की, ‘काही लोकांनी मला पकडून कॅम्पमध्ये नेले. तिथे मारहाण केली. मला मारल्यानंतर खाऊपिऊ घातले. दारू पाजली. त्यानंतर त्यांनी माझा व्हिडीओ बनवला. माझ्यासोबत अजून चार जणांना पकडण्यात आले होते. यामधील एकाचे नाव सागर होते.’

योगेशने पुढे दावा केला की, ‘त्या लोकांनी मला घाबरवले. आम्ही सागरला ठार केले आहे, असे सांगितले. आता तुला सुटायचे असेल तर आता आम्ही सांगू ते तुला प्रसारमाध्यमांसमोर सांगावे लागेल. तिथे एक खोटी कहाणी रचण्यात आली. ती मी प्रसारमाध्यमांसमोर सांगितली. त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी हे सारे सांगितले. त्यानंतर मी पोलिसांसमोर गेल्यावर खरी परिस्थिती सांगितली.’

दरम्यान, योगेशचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आपण शेतकऱ्यांनी जे बोलायला सांगितलं होते. तेच बोललो. मात्र, हा व्हिडीओ अधिकृत असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. मात्र या तरुणाला सोनीपत पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; घ्या जाणून
लस घ्यायची असल्यास सरकारच्या ‘या’ आदेशांचे करावे लागणार पालन; घ्या जाणून
शिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.