सातारा | साताऱ्यातील वाई पोलीस ठाण्यात एका महिलेने सामूहिक बला’त्काराची तक्रार दाखल केली. परंतु या महिलेने ही तक्रार चुकीची आणि द्वेषापोटी केली असल्याचे कोर्टात सिद्ध झाले आहे. हे प्रकरण या महिलेला चांगलच भोवल आहे. कोर्टाने महिलेच्या विरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
नोकरीचे आमिष दाखवत वाई ते महाबळेश्वर दरम्यान गाडीत वारंवार सामूहिक बला’त्कार केल्याची तक्रार वाई येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार वाई पोलिसांनी तापस केला असता धक्कादायक सत्य समोर आले. यामध्ये तक्रारीत दिलेल्या सर्व बाबी चुकीच्या असल्याचे उघड झाले आहे.
वाई पोलीसांनी केलेल्या तपासात तक्रारीनुसार आरोपी असलेल्या दोघांपैकी एक आरोपी गुन्हा घडल्याच्या दिवशी परदेशात होता. तसेच दुसरा पुण्यात असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच ज्या कारमध्ये बला’त्काराचा हा गुन्हा घडल्याचे सांगितले गेले ती कार त्यावेळी नांदेडमध्ये असल्याची महिती उघड झाली.
राज्यात अशा घटनांची संख्या वाढत आहे. याप्रकरणी कोर्टाने दिलेला निकाल आणि पोलिसांनी केलेला तपास हा अशा अनेक प्रकरणांसाठी मार्गदर्शक ठरेल. अशा प्रकारे एखाद्याच्या आयुष्यावर होणारी चिखलफेक थांबण्यासाठी कडक कारवाई होणे महत्वाचे आहे.
दरम्यान, या महिलेने दिलेल्या तक्रारीत आणि तपासतील बाबीत तफावत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट दिसुन आले. परंतु यासंदर्भात महिलेने दिलेली तक्रार खोटी आणि चुकीची असल्याचे कोर्टात सिद्ध झाले आहे. कोर्टाने अशी चुकीची आणि द्वेषापोटी तक्रार करण्याऱ्या महिलेविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला! ८०० कोबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच; अहवालात स्पष्टीकरण
ही इलेक्ट्रिक स्कुटर एकदा चार्ज केल्यानंतर धावते तब्बल १०० किलोमीटर, किंमत वाचून आश्चर्य वाटेल
“फडणवीसांची लोकप्रियता सरकारला खुपते म्हणूनच आकसबुद्धीने सुरक्षा कपातीचा निर्णय घेतला”
क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता इरफान चित्रपटात नशीब आजमावणार; टीझर तुफान हिट