Share

शिवसेना आमदाराच्या घरावर बनावट अधिकाऱ्याचा छापा, पण काही वेळातच बिंग फुटले

bajoriya

अकोला जिल्ह्यतूल एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आयबीचा अधिकारी असल्याचे सांगत शिवसेना आमदार विल्पव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया(Gopikishan Bajoriya) यांच्या घरावर धाड टाकली. पण काही वेळातच या बनावट आयबीच्या अधिकाऱ्याचे बिंग फुटले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(Fake officer raids Shiv Sena MLA’s house)

गुरुवारी ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता एक कार शिवसेना आमदार विल्पव बाजोरिया यांच्या महाबीज कार्यालयाजवळ असलेल्या बंगल्यामध्ये आली. या कारमधून एक व्यक्ती बाहेर आला. तो व्यक्ती कार पार्क करून बंगल्याच्या समोरील बाकावर जाऊन बसला. त्यानंतर यश बाजोरिया आणि त्यांचे काका संजय बाजोरिया त्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याची विचारपूस केली.

यश बाजोरिया यांनी त्या व्यक्तीला माहिती विचारली. त्यावर त्या व्यक्तीने आपले नाव प्रतिक संजयकुमार गावंडे असे सांगितले. आपण ‘आयबीचा माणूस’ असल्याचे देखील त्या व्यक्तीने सांगितले. पण त्या व्यक्तीच्या हालचालीवरून यश बाजोरिया आणि संजय बाजोरिया यांना संशय आला. त्याचवेळी त्या व्यक्तीने बंगल्यात उभ्या असलेल्या सर्व गाड्यांची कागदपत्रे आणि चाव्या बाजोरिया कुटुंबीयांकडे मागितल्या.

यावर बाजोरिया कुटूंबियांनी नकार दिला. यावर त्या व्यक्तीने दमदाटी आणि शिवीगाळ करत दोन गाड्यांच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तो व्यक्ती बाजोरिया कुटूंबियांकडे घराची कागदपत्रे मागू लागला. यावर बाजोरिया कुटूंबियांनी नकार देताच तो घरात जाण्याचा प्रयत्न करू लागला. यानंतर बाजोरिया कुटूंबियांनी त्याची अडवणूक करत त्याला जाण्यास सांगितले.

यावर शिवीगाळ करत बघून घेतो, अशी धमकी त्या व्यक्तीने बाजोरिया कुटूंबियांना दिली. यानंतर यश बाजोरिया यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधान कलम ४५२, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तातडीने आरोपी प्रतिक संजयकुमार गावंडे याचा शोध घेत त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक संजयकुमार गावंडे याला वाहनांवर असलेल्या युनिक नंबरचे फोटो काढण्याचा छंद आहे. त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. आरोपी प्रतिक संजयकुमार गावंडे सध्या मानसिक तणावात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेची अकोला परिसरात चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘दिलेली शिक्षा भोगायला तयार’ ऑस्करमधील वादानंतर विल स्मिथचं मोठं पाऊल, ‘या’ संस्थेतून झाला पायउतार
..त्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी आणि अजित दादांना लाख लाख धन्यवाद, उद्धव ठाकरेंनी केले कौतुक
KKR Vs PBKS च्या मॅचमध्ये रसेलने मारले ८ सिक्सर पण चर्चा मात्र सुहाना खानचीच; व्हायरल झाले बोल्ड फोटो

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now