भारतातील आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात महागडी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आयपीएल स्पर्धेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींना आयपीएल स्पर्धेची उत्सुकता असते. पण काही वेळा अनेकजण या स्पर्धेच्या नावाचा गैरवापर देखील करतात. असाच काहीसा प्रकार गुजरातमधून(Gujrat) समोर आला आहे.(Fake IPL league in gujrat Millions of lime to bookies)
गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील मोळीपुर गावामध्ये बनावट आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून चक्क शेत मजुरांना मैदानात उभं करण्यात आलं होतं. या शेत मजुरांना खेळाडू प्रमाणे अभिनय करण्यासाठी प्रत्येकी ४०० रुपये देण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बनावट आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी बनावट मैदान देखील तयार करण्यात आलं होतं. तसेच बनावट पंच आणून त्यांच्याकडे खोटे वॉकी-टॉकी देण्यात आले होते. पाच एचडी कॅमेऱ्यांद्वारे हे सामने शूट करण्यात आले. तसेच या सामन्यांचे युट्युबवर थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले.
रशियामधील अनेक लोकांनी या सामन्यांवर सट्टेबाजी केली. यासाठी आरोपीने एक खास टेलिग्राम चॅनेल देखील काढले होते. या टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून सामन्यांवर सट्टेबाजी केली जात होती. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजी व इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोएब नावाच्या व्यक्तीने ही बनावट आयपीएल स्पर्धा आयोजित केली होती. या सामन्यांसाठी शोएबने गुलाम मसिह नावाच्या व्यक्तीकडून शेत भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी शोएबने एक क्रिकेटचे मैदान तयार केले. तसेच या मैदानावर हॅलोजन देखील लावण्यात आले. कॉमेंट्री बॉक्सची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.
कॉमेंट्रीसाठी हर्षा भोगले यांची मिमीक्री करणाऱ्या कलाकाराचा आवाज वापरण्यात आला. या स्पर्धेसाठी २१ शेतमजुरांचा बनावट खेळाडू म्हणून वापर करण्यात आला होता. या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघाच्या जर्सी देखील देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियामधील व्यक्तीच्या सांगण्यावरून हा प्रकार घडत होता. पोलीस सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
हा बायकोबरोबर संबंध ठेवून माझ्याशी…, बड्या नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल
बंडखोरांना काय तो दांडा, काय ते ढुं.. म्हणणाऱ्या नगरसेविकाच शिंदे गटात सामील, कारणही सांगितलं
“या राजकीय नेत्यांना लोक चपलांनी मारतील”, तृप्ती देसाईंचा श्रीकांत देशमुखांवर निशाणा