अखेर मृत्यूशी झुंज अपयशी! बहिणीने भावासाठी केलं होत यकृत दान, शस्त्रक्रियेनंतर भावाचा मृत्यू

पुणे। काही दिवसांपूर्वी शेलपिंपळगावातील एक बहिण आपल्या भावाला स्वतःच यकृत दान करणार असल्याची माहित समोर आली होती. वाडा – पावडेवाडी येथील शेतकरी गरीब कुटुंबात राहणाऱ्या होमगार्ड पथकातील कुणाल उर्फ कृष्णा दिलीप पावडे या बावीस वर्षीय तरुणाला कर्तव्य बजावत असताना कावीळ आजाराने ग्रासले, त्यामुळे त्याचा गंभीर परिणाम त्याच्या शरीरावर झाला होता.

कृष्णाचे किडनी व यकृत खराब झाले होते. कृष्णाच्या बहिणीने आपल्या भावाला यकृत दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रुबी हॉल रुग्णालयामध्ये हि शस्त्रक्रिया पार पडली. मात्र कृष्णाची तब्येत खालावली व अखेर १० जून ला सकाळी ९ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.

डॉक्टरांनी कृष्णाच्या शस्त्रक्रियेसाठी १५ ते २० लाख खर्च सांगितला होता. मात्र घरची परिस्थिती गरीब असल्याने एवढा खर्च परवडणार नव्हता. कृष्णाच्या दोन बहिणी आहेत. त्यापैकी रेणुका महिंद्रा शिंदे हिने आपल्या भावाला यकृत दान करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनतर २ जुलैला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुबी हॉलने १० लाख रुपये ऑपरेशनचे होतील आणि २ लाख मेडीसिनचे होतील असे एकूण १२ लाख रुपये भरा म्हणून सांगितले.

बाकीची सर्व रक्कम एनजीओ संस्थाकडुन आम्ही घेऊ असे सांगितले. त्यानुसार पावडे कुटुंबाने सदर रक्कम १२ लाख रुपये रुबी रुग्णालयात भरले. मात्र निधनानंतर १२ लाख रुपये हा खर्च फक्त ऑपरेशनचा आहे. तुमचा पेशंट ॲडमिट झाल्यापासून ऑपरेशन सोडून बाकीचा सर्व खर्च ४ लाख रुपये झाला आहे असे रुबी हॉलने सांगितल.

ही सर्व रक्कम भरेपर्यत कृष्णाचा मृतदेह ताब्यात देणार नाही असेही ते म्हटले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांनी व कृष्णाच्या मित्रांनी प्रयत्न केला मात्र १८ तास मृतदेह तात्कळत ठेवण्यात आला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामधे आलेले आहेत असे समजल्यावर पावडे कुटुंबाने ही व्यथा

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अजितदादांच्या समोर मांडली. अजितदादांनी रुबी हॉलमधे एक फोन केल्यावर लगेचच कुणालचा मृतदेह पावडे कुटुंबाच्या ताब्यात देतो असे सांगितले. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता कुणालचा मृतदेह पावडे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र एवढे प्रयत्न करूनही कुणालाच जीव वाचवू शकला नसल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या
तब्बल २३ वर्षांचे शत्रुत्व विसरुन भाजप नेत्याला भेटले ज्योतिरादित्य सिंधिया; जाणून घ्या शत्रुत्वाचे कारण
‘ही तर बेसुऱ्यांची फौजच!’ सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, ‘अग्गबाई सुनबाई’मालिकेला मिळाले नवे वळण
संभाजीराजेंचा साधेपणा, ताफा थांबवून शेतात केलं जेवण; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.