व्हिडिओ कॉलवर तोंडी परीक्षा द्या आणि दहावी-बारावीत प्रवेश मिळावा; नापास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

 

मुंबई | नववी आणि अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश मिळणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओकॉलच्या माध्यमातून किंवा थेट वर्गात तोंडी परीक्षा घेऊन त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनामुळे नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्या असून विद्यार्थ्यांना वर्षभरातील झालेल्या परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार दहावी आणि बारावी प्रवेश दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना सरासरी गुणांनुसार दहावी आणि बारावीत प्रवेश दिला असला तरी काही विद्यार्थी वर्षभरातील परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना प्रवेश कसा मिळेल? या प्रश्नावर ही सरकारने आता तोडगा काढला आहे.

नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहून तोंडी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्याची संधी शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.