Share

Devendra Fadanvis : मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदेच्या जागेवरही भाजपचा दावा; फडणवीस म्हणाले उरलेल्या शिवसेनेबाबत…

Shrikant Shinde Devendra Fadanvis

Devendra Fadanvis  : एकीकडे शिवसेना कोणाची हा प्रश्न असतानाच भाजप आणि शिंदे गटाची युती झाली आहे. तसेच शिंदे गट आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे. यापुढील निवडणूक भाजप आणि शिंदे गटाने सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पक्षसंघटना वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. यातच २०२४ च्या लोकसभा निवणुकीकरीता भाजप राज्यातील १६ मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे. यात कल्याण मतदारसंघाचाही समावेश आहे.

त्यामुळे कल्याण मतदारसंघावर भाजप आपला दावा करणार का?, अशा चर्चा सर्वत्र सुरु आहेत. तसेच भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसीय दौरा करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा आहे. श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार आहेत.

त्यामुळे त्यांच्या मतदारसंघावर भाजप आपला दावा सांगणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा थांबवल्या आहेत. आमच्यासोबत एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांच्या जागेवर आम्ही का दावा करू?, असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

तसेच उरलेल्या शिवसेनेच्या जागांबाबतीत भाजप आणि शिंदे एकत्र निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर होते. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाविषयी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा कुठल्याही राजकीय हेतूचा दौरा नाही. राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी मी येतो आहे. तसेच रामोशी समाज हा काही कारणामुळे मागे राहिला आहे. त्यामुळे आमचे नवे सरकार या समाजासाठी विविध योजना घेऊन येऊ इच्छित आहे, असे ते म्हणाले.

बारामतीविषयी विचारले असता “आमचं मिशन महाराष्ट्र सुरु आहे, मिशन इंडिया सुरु आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येतं, महाराष्ट्राबाहेर नाही. त्यामुळे मिशन महाराष्ट्रांतर्गत बारामती आहे”, असेही ते म्हणाले. आगामी निवणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या
Rohit Sharma : ‘खूपच घमंडी आहे हा’; अर्शदीपसोबत रोहीत शर्मा जे वागला ते पाहून संतापले चाहते
‘या’ शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार रद्द; भाजप आमदार प्रशांत बंबांनी गुरुजींना दणका दिलाच
“जसं सीटबेल्ट अनिवार्य केलाय तसंच रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांना खड्डयात उभं करा”
बीडमध्ये मुलींचा धिंगाणा; भर मेळाव्यात एकमेकींना फ्री स्टाइल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now