फडणवीसांच्या पत्नीचं व्हॅलंटाईन स्पेशल गिफ्ट; सोशल मिडियावर घालतंय धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी त्यांच्या गोड आवाजामुळे, फॅशनेबल राहणीमानामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी व्हॅलंटाईन डे च्या दिवशी एक गाणं गायलं आहे.  त्यांच्या या गाण्याला अनेकांनी पसंद केले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे.

 

अमृता फडणवीस या सोशल मिडियावर कायम अॅक्टिव असतात. देशात, राज्यात सूरू असलेल्या विषयावर त्या आपले मत मांडत असतात. त्यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. आजवर त्यांनी अनेक विषयावर गाणी गायली आहेत.  काल (दि.१४) व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने त्यांनी ‘ये नैना डरे डरे’ हे गाणं अगदी सुरेल आवाजात म्हटलं आहे. समुद्र किनार्‍यावर गायलेले हे गाणं सोशल मिडियावर शेअर केले आहे. त्यांच्या चाहत्यांनी गाण्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हॅलंटाईन वीक सुरू झाल्यावर सोशल मिडियावर अमृता फडणवीस यांचा लाल ड्रेस वरील बीच जवळील  फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत होता. अनेकांना हा फोटो नेमका कशा संदर्भात आहे आहे याचा प्रश्न पडला होता. अखेर  आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

 

अमृता फडणवीस यांचं हे गाणं दिग्दर्शक आशिष पांडा  यांनी तयार केलं आहे. या गाण्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत ५० हजार पेक्षा जास्त जणांनी गाण्याचा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी अमृता फडणवीस यांचं कौतूक केलं आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं; प्रेयसीबद्दल चिठ्ठीत लिहिल्या धक्कादायक गोष्टी
आररर खतरनाक! व्हॅलेंटाइन्सला बॉयफ्रेंडने दिला धोका, मग काय गर्लफ्रेंडने घातला शहरात धिंगाणा
व्हॅलेंटाईन डे स्पेशल: फक्त ७५० रुपयांमध्ये केले होते लग्न नाना पाटेकरने लग्न; वाचा त्यांची लव्ह स्टोरी

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.