फडणवीस म्हणतात, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल दहा रूपयांनी महाग

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अनेक क्षेत्रांसाठी निधींची तरतुद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. अर्थसंकल्पावर आता विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्थसंकल्पातील योजना आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या आहेत. अर्थसंकल्पान शेतकरी, नोकरदार, महिलावर्ग सर्वांना निराश केलं आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त रडगाणं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, हे राज्य सरकारचं बजेट होतं की मुंबई महापालिकेचं? असा प्रश्न मला पडला आहे. राज्य सरकारला पेट्रोल  डिझेलच्या दरावर बोलण्याचा अधिकार नाही. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल दहा रूपयांनी महाग आहे. कारण राज्य सरकारचा कर जास्त आहे.

दरम्यान, केंद्र सरकारला नावे ठेवायची आणि दुसरीकडे त्यांच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख अर्थसंकल्पात करायचा, असं राज्य सरकार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रानेच कमी करावेत, फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे प्रतिउत्तर
महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीत मिळणार सुट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
“वर्षा बंगल्यावर धूणीभांडी, वॉचमनचं तरी काम द्या”, बेरोजगारांची मुख्मंत्र्यांकडे मागणी
मोठी बातमी! अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ घोषणा

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.