फडणवीसांनी शरद पवारांना पुराव्यानिशी उघडे पाडले; उतारवयात इतकी बेइज्जती होऊ नये

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. यावरून भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जबरदस्त वॉर सुरू आहे.

एकीकडे फडणवीस पत्रकार परीषद घेत रोज़ नवनवे गौप्यस्फोट करत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेत आहेत.

पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झालेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेत आहेत. याचाच धागा पकडत आज मुंबईमध्ये फडणवीस यांनी अनिल देशमुखांना वाचवणारे शरद पवारांचे सगळे मुद्दे पुराव्यानिशी खोडून काढले.

‘गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करताना शरद पवार यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेण्यात आली, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला योग्यप्रकारे माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे दिल्लीतील पवारांच्या पत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीसांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नेहमीच्या प्रथेला छेद दिला. “नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो. त्यानंतर हिंदीत करतो,’ असे फडणवीस म्हणाले.

‘पण शरद पवारांनीच हा विषय राष्ट्रीय केला असल्यानं आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरू करणार आहे”, असे फडणवीस म्हणाले. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

याप्रकरणी आता भाजप नेते सुनील देवधर यांनी शरद पवारांवर अतिशय कडवी टिका केली आहे. ते म्हणतात की, शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे. अनिल देशमुख प्रकरणात हे पुन्हा एकदा समोर आले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी त्यांना उघडे पाडले. उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची. करावे तसे भरावे!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.