‘वारकऱ्यांना स्वखर्चाने रेनकोट देणारे फडणवीस आणि वारकऱ्यांकडून तिकीटाचे पैसे घेणारे ठाकरे’

पंढरपूर । कोरोनामुळे प्रथमच आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या एसटीमधून पंढरपूरला घेऊन जाण्यात आल्या. दरवर्षी लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी होतात. मात्र, कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द करण्यात आला .

पंढरपूरला जाणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले. शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची कामगिरी समोर आली आहे.

यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारवर चौफेर टीका आता होऊ लागली आहे. शासनाकडून बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

आता प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. यावर आता भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केला आहे.

पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना स्वखर्चाने रेनकोट देणारे देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले आणि वारकऱयांकडून प्रवासाचे तिकीट घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नवे रूप महाराष्ट्राला पाहायला मिळते आहे.

संत निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी भाडेवसुली करणे त्यांच्या नव्या कथित धर्मनिरपेक्षतेसाठी आवश्यक असेल. 22 मार्च पासून लॉकडाऊन असलेले मुख्यमंत्री पंढरपूरपर्यंत गेले, हे ही काय थोडे झाले ? असेही शिवराय कुळकर्णी यावेळी म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.