‘नागपुरमधील आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्येमागे फडणवीस आणि भाजपचा हात’

नागपुर | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर विरोधीपक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. राज्यभरात भाजपने गृहमंत्र्यांविरोधात आंदोलने सुरू केली आहेत.

अशातच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नागपुरमध्ये २००६ साली घडलेल्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांवर आरोप लावला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन केले आहे.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला आहे. फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. एकनाथ निमगडे यांच्या हत्येमागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही नेत्यांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलं होतं. असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंगांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होत. आता राष्ट्रवादीने भाजप नेते फडणवीसांवरच आरोप लावल्याने भाजप आता काय भूमिका घेतयं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस चव्हाट्यावर! ‘अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईल’
गायी म्हशी न पाळता ही महिला करतेय शुद्ध तुपाची निर्मिती अन् कमवतेय लाखो रुपये
मी नाही सुशांतनेच मला सोडलं, अंकिता लोखंडेने केला सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा
‘राष्ट्रवादीवाले स्वतःला फार मोठे समजतात पण एक महिला किंवा पोलीसवाला त्यांची वाट लाऊन जातात’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.