फॅक्ट चेक: १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार?; केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

गेले काही दिवस ‘१००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. त्यामुळे या जुन्या नोटा इतिहासजमा होणार आहेत.’ अशी बातमी वेगाने व्हायरल होत होती. परंतु ही बातमी पुर्णपणे फेक असून पीआयबी फॅक्ट चेकने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.

येत्या मार्च महिन्यापासून १०० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद होतील. त्याबरोबरच १० रुपये आणि ५ रुपयाच्या जुन्या नोटाही चलनातून बाद होणार आहेत. असे वृत्त व्हायरल होत होते. पण पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हे वृत्त फेक असल्याचे समोर आलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करुन म्हटले आहे की, “एका वृत्तात दावा केला जात आहे की, आरबीआयच्या माहितीनुसार मार्च २०२१ नंतर ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार होणार. हा दावा खोटा आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.”

पीआयबीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही सांगितले आहे की, “१००, १० आणि ५ रुपयांच्या सर्व जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम राहतील. या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा सध्या कोणताही विचार नाही.” पीआयबी ही भारत सरकाराची विविध उपक्रम, धोरणे याबाबत वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांना माहिती पुरवणारी प्रमुख एजन्सी आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातला धिंगाणा; रोहित पवारांवर अर्ध्यातून कार्यक्रम सोडण्याची नामुष्की

आता तुम्हाला ऑनलाईन मिळेल मतदान कार्ड; जाणून घ्या कशारितीने डाऊनलोड करायचं

दिग्दर्शकाच्या ‘त्या’ घाणेरड्या मागणीला कंटाळून मल्लिका शेरावतने सोडली होती फिल्म इंडस्ट्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.