बेरोजगारांना मोदी सरकार देतंय महिन्याला ३८०० रुपयांचा भत्ता?; वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य

मुंबई | अलीकडे सोशल मिडीयाने संपूर्ण जग जवळ आले आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक गोष्टी काही वेळात व्हायरल होतं असतात. अनेक जण तर त्या व्हायरल मेसेजमागील सत्यता न पाहताच पुढे पाठवत असतात. यातील बरेच मेसेज हे खोटे असतात.

अशातच आता केंद्र सरकार १८ ते ५० वर्षांमधील बेरोजगारांना दर महिन्याला ३८०० रुपयांचा भत्ता देत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेच्या अंतर्गत ही आर्थिक मदत दिली जात असल्याचा दावा केला जात आहे. या सोबतच या मेसेजमध्ये एक लिंक देखील देण्यात आली आहे.

मात्र या मेसेजबाबत पडताळणी केली असता प्रेस इन्फर्मेशन ब्युरोनं फॅक्ट चेक करून व्हायरल झालेला मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. तसेच सरकार अशा प्रकारचा कोणताही भत्ता जाहीर केलेला नाही. सरकारने अशी कोणतीही योजना आणलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा काय होते ‘त्या’ व्हायरल मेसेजमध्ये…
व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली असून या लिंकवर क्लिक केल्यावर बेरोजगारांना आर्थिक मदत मिळेल, असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

याचबरोबर ‘१८ ते २५ वयोगटात येणाऱ्यांना महिन्याला १५०० रुपये, २५ ते ३० वयोगटात मोडणाऱ्यांना २००० रुपये, ३१ ते ३५ वयोगटातल्यांना ३००० रुपये, ३६ ते ४५ वयोगटातील ३५०० हजार रुपये, तर ४४ ते ५० वयोगटातील लोकांना ३८०० रुपयांचा भत्ता देण्यात येईल,’ असे या मेसेजमध्ये आहे.

महत्त्वाच्या बातम्या
तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा ‘१’ असेल तर ही बातमी वाचाच; भरावा लागू शकतो दंड
‘जीव गेला तरी बेहत्तर पण शरण जाणार नाही’, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी फोडली डरकाळी
‘जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील’; शरद पवारांचा मोदी सरकारला थेट इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.