मोदींनी खरंच घेतला होता बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग? समोर आला ‘हा’ महत्वाचा पुरावा

मुंबई : “बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटले होते.

बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आता मोदींनी केलेल्या दाव्यावरुन मोदी समर्थक आणि विरोधक आमने सामने आले आहेत.

पंतप्रधान मोदींनी हा खोटा दावा केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. मात्र बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी त्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये सापडतो. याबाबत न्यूज १८ ग्रुपचे कार्यकारी संपादक असणाऱ्या ब्रिजेश कुमार सिंग यांनी ट्विट केले आहे.

सिंग यांनी मोदींनी लिहिलेलं पुस्तक पोस्ट केले असून त्यामध्ये मोदींनी गुजरातमधील संघर्षामधील अनुभव आहेत. या पुस्तकाच्या बॅक कव्हरवरील मजुकारचे भाषांतर, “आणीबाणीचे २० महिने, सरकारी कामकाजाचे अपयश सिद्ध करत भूमिगत चळवळीच्या माध्यमातून काम केलं आणि स्वत:मधील संघर्ष करण्याची वृत्ती कायम ठेवली. यापूर्वी आम्ही बंगलादेशच्या सत्याग्रहाच्या वेळी तिहार तुरुंगामध्ये जाऊन आलो,” असे आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या निर्मितीसाठी सत्याग्रह केला आणि त्यासाठी तुरुंगात जावं लागल्याचा उल्लेख आज ढाक्यामध्ये केला. त्यानंतर त्यांच्या टीकाकारांच्या पोटात दुखू लागलं आहे.

याबाबत संभ्रम निर्माण करणारं वातावरण तयार केलं जात आहे. यावरुन टीका करणाऱ्यांना १९७८ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं शेवटचं पान पाहून निराश व्हावं लागेल,” असे म्हणत सिंग यांनी एका पुस्तकाचे दोन फोटो ट्विट केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

कडक सॅल्युट! वडिल वारले, आई हॉस्पिटलमध्ये, पोलिसांनी त्या मुलाला घेतले दत्तक

पुणे तिथे काय उणे! कमी खर्च अन् धुमधडाक्यात लग्न, पहा ट्रकवरील फिरतं मंगल कार्यालय

‘या’ एका चुकीमुळे वाझे पुरता अडकला, एनआयएने केला नवा धक्कादायक खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.