दिल्ली हिंसाचारातील ‘व्हिलन’ दीप सिध्दूचा फेसबुक लाइव्ह वरून शेतकरी नेत्यांना इशारा

दोन महिन्यांपासून केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी आंदोलनात दीप सिध्दू नावाचा तरुण दिसून आला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

पंजाबी अभिनेता असलेला दीप सिध्दूनेच लाल किल्ला परिसरात आंदोलकांना घुसवले आणि झेंडा फडकवला असा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर हिंसाचाराला जबाबदार ठरवण्यात आलेला अभिनेता दीप सिध्दू याने फेसबूक लाइव्ह करत त्याच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले  आहेत.

दीप सिध्दूने म्हटले की, मला यामध्ये अडकवलं जात आहे. माझ्याकडे सर्व गोष्टींचे पुरावे आहेत. मी जर तोंड उघडले तर शेतकरी नेत्यांना पळता येणार नाही. माझ्या बाबत कुणी काहीही बोलत आहे. पण मी आता स्पष्ट बोलणार नाही. लाल किल्ल्यावर जे काही झाले ते कोणाच्या सांगण्यावरून झाले हे सांगितलं तर शेतकऱ्यांचे नेते आंदोलन सोडून जातील.

तसेच तो पुढे म्हणाला की, पोलिसांनी आम्हाला जे काही करायचे आहे ते करा पण शांततेत करा असं सांगितलं होतं. आम्ही लाल किल्ल्यावर कशाचेच नुकसान केले नाही. असं सिध्दूने स्पष्ट केले आहे. यावेळी त्याने काँग्रेस, आरएसएस, भाजपसोबत माझा काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-

दिल्ली हिंसाचारावर अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…
सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती ३० व्या वर्षी की वयाच्या ५० व्या वर्षी? सरकारने घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द
भाजपच्या वेबसाईटवर खा. रक्षा खडसेंचा लाजिरवाना उल्लेख; वाचून तुम्हालाही संताप येईल

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.