‘या’ उपायाने ४५ टक्क्यांनी कमी होतंय कोरोना संसर्गाचे प्रमाण; संशोधनातून खुलासा

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनावरील लस अजूनही बाजारात आलेली नाहीये. त्यामुळे आपण सध्या मास्कच्या मदतीने घराबाहेर पडत आहोत. सुरक्षित अंतर, स्वच्छता पाळून आपण सर्वजण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत.

अशातच अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने केलेल्या संशोधनात प्रकाशित केलेल्या नवीन शोधपत्रात दिसून आले आहे की, कोणत्याही जर्मन प्रदेशात फेस मास्क वापरल्यानंतर २० दिवसानंतर त्या प्रदेशात नवीन कोरोना संक्रमणाच्या केसेसमध्ये ४५ टक्के कमतरता दिसून आली आहे.

वाचा फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स…

गाईडलाईन्सनुसार,  ज्या भागात कोरोना पसरत आहे. तेथे १२ वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्वांनीच मास्कचा वापर करावा. तसेच ज्याठिकाणी व्यवस्थितपणे हवेचे व्यवस्थापन नसेल, अशा घरांमध्येही पाहुने आल्यानंतर मास्कचा वापर करण्यात यावा.

याचबरोबर कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी सातत्याने हात धुण्यावरही भर द्यायला हवा. अशीही सूचना गाईडलाईन्समध्ये देण्यात आली आहे. फेस मास्क व्हायरसपासून संरक्षण देतात यामुळे याचा वापर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी फेस मास्क वापरासंदर्भातील नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
…तर हे दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही; शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा
कोरोना संक्रमणामुळे वाढतोय आजारांचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
गुड न्यूज! ‘या’ कंपनीने केंद्राकडे मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.