..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार?

औरंगाबाद । दररोज अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. अशीच एक विचित्र घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातुन समोर आली आहे. नातेवाईकांनी एका आजीला मृत समजून अंत्यसंस्काराची तयारी केली. रुढी परंपरेनुसार सर्व विधीही पार पाडले. तिरडीवर ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आले.

प्रेत सरणावर ठेवून शेवटचा विधी पार पडणार तोच आजीबाई जिवंत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रेत सरणावर ठेवून फक्त तोंड उघडे ठेवण्यात आले होते. दरम्यान आजीबाईंची पापणी हलली.

त्यापाठोपाठ हाताची हालचाल झाल्याने वृद्धेस सरणावरून काढून तातडीने कन्नडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जिजाबाई वाल्मिकी गोरे असे संबंधित आजीबाईंचे नाव असून त्या ९० वर्षांच्या आहेत. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान त्या निपचित पडल्या होत्या.

कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आजीबाईंचा मृत्यू झाल्याचा गैरसमज नातेवाईकांना झाला. त्यामुळे त्यांनी आजीबाईचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्या सर्व नातेवाईकांना दिली. तसेच अंत्यसंस्काराची सर्व तयारीही केली.

काही वेळातच सर्व नातेवाईकही अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले. शेकडो नातेवाईकांच्या उपस्थितीत आजीबाईवर रुढी परंपरेनुसार सर्व विधी पार पडले. यानंतर त्यांनी तिरडीवर ठेवून स्मशानभूमीतही नेण्यात आले. तसेच त्यांचा मृतदेह सरणावर ठेवून प्रेताला लाकडांनी झाकण्यातही आले.

शेवटचा विधी म्हणून पाणी पाजण्यासाठी केवळ चेहरा उघडा ठेवण्यात आला होता. पाणी पाजण्याच्या वेळी आजीबाईंची पापणी हालली आणि सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. यानंतर आजीबाईंचा हात हलल्याचंही उपस्थितांच्या निदर्शनास आलं. यानंतर नातेवाईंकांनी त्वरित आजीबाईंना सरणावरून काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

हा घडलेला प्रकार पाहून नातेवाईकांना त्यांच्या डोळ्यावरच विश्वास नाही बसला. काही तासांपूर्वी मृत समजून जिच्यावर आपण अंत्यसस्काराचे विधी पूर्ण केले, तीच आजी जीवंत असल्याचे पाहून अनेकांनी आनंदाचा पारावर उरला नाही.

ताज्या बातम्या

आता राज्यात किराणा दुकानातही मिळणार वाईन, शरद पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण

काजू , बदाम आणि अक्रोड भिजवून खात असाल तर हा लेख वाचा; आरोग्यास होणारा धोका टळेल…

VIDEO: भरमंडपात ढसाढसा रडायला लागली नवरी; नवरदेवाने सगळ्यांसमोर किस करत केलं गप्प

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.