Share

लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा स्फोट, नवरदेवाने गमावले दोन्ही डोळे, वाचून हादराल

गुजरातमधील एका कुटुंबासाठी लग्नात मिळालेली भेट खूपच वेदनादायी ठरली. कुटुंबातील नवविवाहित तरुण लग्नात मिळालेल्या भेटवस्तू खोलून पाहत असतानाच एका भेटवस्तूचा स्फोट झाला. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वासंदा तालुक्यात मंगळवारी १७ मे रोजी ही घटना घडली.(Explosion,teddy bear,wedding gift)

वृत्तानुसार, सर्व भेटवस्तू उघडत असताना, तरुणाने पाहिले की त्याला कोणीतरी इलेक्ट्रिक टेडी बेअर दिला आहे. मात्र त्याने जसा टेडी बेअर चालू केला तेवढ्यात मोठा स्फोट झाला. या अपघातात नवरदेव आणि त्याचा ३ वर्षांचा पुतण्या गंभीर भाजला आहे. सध्या पोलीस हे गिफ्ट पाठवणाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.

लतेश गावित असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिठंबरी गावातील लतेशचा विवाह १२ मे रोजी सलमा नावाच्या मुलीशी झाला होता. साहजिकच नातेवाइकांनीही विवाहित जोडप्यांना लग्नात अनेक भेटवस्तू दिल्या. मंगळवार, १७ मे रोजी लतेश लग्नात मिळालेल्या भेटवस्तू पाहत होता. यादरम्यान त्याने इलेक्ट्रिक टेडी बेअर असलेले पॅकेट उघडले.

टेडी बेअर पाहून लतेशने आपल्या ३ वर्षांच्या पुतण्याला ते दाखवण्यासाठी बोलावले. ते सुरू करण्यासाठी दोघांनी प्लग इन करताच त्यात मोठा स्फोट झाला. लतेशचे सासरे हरीश भाई यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने त्यांना अपघाताची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज संपूर्ण गावात ऐकू आला.

आवाज ऐकून ग्रामस्थ लतेशच्या घरी पोहोचले असता त्यांना लतेश आणि त्याचा पुतण्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दोघांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात लतेशच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, तसेच डावा हात आणि मनगटही वेगळे झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात लतेशच्या शरीराचा वरचा भाग गंभीररित्या भाजला.

हरीश भाई यांनीही लतेशचे डोळे दान करण्याची इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली, मात्र त्यांची प्रकृती सुधारल्यानंतरच काही सांगता येईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हरीश भाई म्हणतात की राजू धनसुख पटेल, त्याच्या मोठ्या मुलीचा माजी प्रियकर – म्हणजे सलमाची मोठी बहीण – याने सलमाच्या लग्नात हे टेडी बियर पाठवले होते.

राजू पटेल यांनी ही भेट गावातील एका आशा कार्यकर्त्याच्या हस्ते त्यांच्या घरी पाठवल्याचे सांगण्यात आले. लग्नाच्या वेळी भेटवस्तू आल्याने घरी कोणी काही बोलले नाही. पण आता सर्वांना एकच शंका आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी वासंदा पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे. पोलिसांनी राजू पटेल याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या आणि नंतर थोड्या कमी करून दिखावा करायचा; ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
‘ब्राह्मणांना आरक्षण देता येणार नाही, त्यांनी आरक्षणाला विरोध करू नये’; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले
लग्नपत्रिकेत तब्बल ३५० पेक्षा जास्त लोकांची नावं; इस्लामपूरच्या लग्नपत्रिकेची राज्यभरात चर्चा
रोहित शर्माची एक्स गर्लफ्रेंड कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस, सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, पहा फोटो

आरोग्य ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now