पेटीएमचे शेअर घेऊन नुकसान झालंय?; टेन्शन घेऊ नका, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणाले…

पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स गुरुवारी कमकुवत लिस्टिंगनंतरही घसरत राहिले. पेटीएमचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमध्ये त्याच्या IPO किमतीच्या जवळपास ९ टक्के खाली सूचीबद्ध झाले आणि नंतर सुमारे २७ टक्के घसरून १५६४ रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या IPO ला १.९ पट सबस्क्रिप्शन मिळाले, जे अनेक विश्लेषकांनी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे सांगितले.

Paytm चा IPO हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा IPO आहे. तरी त्याची सूची या वर्षातील सर्वात वाईट सूचीपैकी एक आहे. कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणाले की, शेअरची किंमत कंपनीचे बिझनेस मॉडेलला नीट दर्शवू नाही शकत आणि त्यामुळे लोकांना ते समजायला थोडा वेळ लागेल.

फायनान्स आणि टेक्नॉलॉजी कंपनीचे एकत्रित मॉडेल अजूनही खूप नवीन आहे, असेही ते म्हणाले. असे असले तरी ज्या गुंतवणूकदारांनी पेटीएमचे शेअर्स घेतले होते, त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

त्यानंतर काही विशेषतज्ज्ञांनी यावर आपली मतं मांडली आहे-

मॅक्वेरी कॅपिटल सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे की पेमेंट बँक म्हणून ते कर्ज देऊ शकत नाहीत. पण जर त्यांना स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना मिळाला तर ते नक्कीच करू शकतात. आम्हाला विश्वास आहे की त्यांना स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना मिळण्याची शक्यता कमी आहे. अर्थात हे सर्व RBI त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते यावर अवलंबून आहे. पण सध्या पेटीएमबद्दल आमचे हे मत आहे.

व्हाईट ओक कॅपिटल मॅनेजमेंटने म्हटले आहे की, पेटीएम आता एखाद्या कनसेप्ट ऐवजी फक्त क्रिया बनली आहे. लोक संभाषणात त्यांचे नाव घेतात आणि पेटीएम करो म्हणतात, म्हणजे ऑनलाइन पे. यूपीआय तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर या क्षेत्राविषयीची चिंता रास्त आहे, कारण यामुळे मोबाइल वॉलेटचे मूल्य कमी झाले आहे.

तर दुसरीकडे, हे देखील पाहिले पाहिजे की UPI वर आधारित PhonePe आणि GooglePay सारखे अनेक नवीन कंपन्या बाजारात चांगल्या नावाने उदयास येताना दिसून येत आहेत. पेटीएमला डिजिटल पेमेंट उद्योगातील अग्रणी म्हटले जाऊ शकते, परंतु तरीही यूपीआय-आधारित पेमेंटमुळे तिला नवीन आव्हानांचा सामना करावा लागला आहे.

तसेच, UPI पेमेंटचा ट्रेंड वाढल्याने पेटीएम सारखी ऍप्स आता मोबाईलवर सर्वाधिक वापरली जाणारी अॅप्स बनली आहेत. त्यांच्याकडून जास्त पैसे मिळत नाहीत, परंतू युजर्सची इंगेजमेंट वाढते. या युजर इंगेजमेंटच्या मदतीनेही पैसे कमवले जाऊ शकतात.

पेटीएमने प्रवास आणि बुकिंग सुविधेसह अनेक सेवा सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत पेटीएम कमाई करण्यात गुंतले आहे. येत्या काही दिवसांत, जर पेटीएम आर्थिक सेवांशी संबंधित उत्पादनांची चांगली विक्री करण्यात यशस्वी ठरली. तसेच, जर ते आपली बँकिंग, विमा आणि गुंतवणूक उत्पादने वाढवू शकले तर दीर्घकाळात ते फायदेशीर होऊ शकते.

स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचा असा युक्तिवाद आहे की कमी वेळ गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार त्यात राहू शकतात कारण नजीकच्या काळात काही परतावा मिळू शकतो. परंतु दीर्घकालीन दृष्टीकोनातून, आम्हाला कोणत्याही चढ-उताराची अपेक्षा नाही. अशा परिस्थितीत, दीर्घकालीन गुंतवणूकदार त्यातून बाहेर पडू शकतात आणि नकारात्मक बाजूने खरेदीसाठी प्रतीक्षा करू शकतात. अशात काही विशेषतज्ज्ञांनी १७२० रुपयांच्या लेव्हलला गुंतवणूकदारांनी हा शेअर विकून टाकावा, असेही म्हटले आहे.

दुसरीकडे, नवीन गुंतवणूकदारांना पेटीएमला मागे टाकणाऱ्या इतर समान कंपन्या शोधण्याचा सल्ला दिला जात आहे. कंपनीने आपल्या ब्रँडच्या आधारे उच्च मूल्यांकनाची मागणी केल्याचेही म्हटले आहे. यामध्ये अल्पावधीत काही सुधारणा दिसून येतील.

महत्वाच्या बातम्या-
सलमान हा बॉलिवूडचा सर्वात हँडसम अभिनेता, धर्मेंद्रने सलमानचे केले तोंडभरून कौतुक
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने मोहम्मद सिराजला मारली चापट, व्हायरल झाला व्हिडीओ
होय माझे मुंबईत बार आहेत; समीर वानखेडेंनी दिली कबुली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.