Share

मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.(Expand the cabinet later, help the affected farmers first’, bacchu kadu statement)

या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे नेते आणि शिंदे गटात सामील झालेले आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

“मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा”, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी सरकारचे कान टोचले आहेत. मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी या भागाची पाहणी केली आहे.

पाहणी केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रशासनाकडून पंचनामे करून आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, “राज्यामध्ये कृषी मंत्री नसले तरीही आम्ही इथे आहोत. आम्ही असताना कृषी मंत्र्यांची काही गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात आढावा घेत आहेत. एकाच दिवशी मोठा पाऊस आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे”, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले की, “संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. ज्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झाले आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे आहे”, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
“दोन वाडपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर ४० जणांची गरज काय?”, सदाभाऊ खोत यांच्या भाषणाची चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा एकनाथ शिंदेंना पाठिंब
संतोष बांगर यांचा आदेश शिवसैनिकांनी धुडकावला; वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now