रविवारी कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूका झाल्या. त्यानंतर सोमवारी मेघालय आणि नागालँडमध्ये मतदान झालं. तसेच त्याआधी १६ तारखेला त्रिपुरामध्येही मतदान झालं होतं. या तिन्ही राज्यातील निवडणूकांचा आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणूकांचा निकाल २ मार्चला लागणार आहे.
या निकालाआधी आता इशान्य भारतातल्या तिन्ही राज्यांचे एक्झिट पोलसमोर आले आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये प्रत्येकी ५९-५९ जागांवर आणि त्रिपुरामध्ये ६० जागांवर मतदान पार पडलं आहे. मेघालय आणि नागालँडमध्येही ६० जागा आहेत. पण त्यांच्या राज्यातील १-१ उमेदवाराचं निधन झाल्यामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
ऍक्सिस इंडिया टुडेच्या एक्झिट पोल आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसत आहे. त्रिपुरामध्ये भाजपला ३६ ते ४५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तृणमूल काँग्रेसला ९ते १६ आणि डाव्यांना ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे मेघालयमध्ये सत्ताधारी एनपीपीला २१ ते २६ जागा, तृणमूल काँग्रेसला ८ ते ११ भाजपला ६ ते ११ आणि काँग्रेसला ३ ते ६ आणि इतरांना १० ते १९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मेट्रिजच्या एक्झिट पोलनुसार नागालँडमध्ये भाजपला ३५ ते ४३, एनएफपीला २ ते ५, एनएपीला १ काँग्रेसला १ ते ३ आणि इतरांना ६ते ११ मिळण्याची शक्यता आहे.
अशात ईटीजीच्या पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपला २४ जागा, सीपीआयला २१ जागा तर क्षेत्रीय पक्ष असलेल्या टीपरा माथोलाला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ऍक्सिस-माय इंडियाच्या पोलनुसार मेघालयमध्ये सत्ताधारी एनपीपीला १८ ते २४ जागा, काँग्रेसला ६ ते १२, भाजपला ४ ते ८ म्हणजेच कोणताच पक्ष बहुमतापर्यंत पोहचू शकणार नाही.
तिन्ही राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्या आहे. एक्झिट पोलही समोर आलेले आहे. त्यावरुन असे दिसते की त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर मेघालयमध्ये तीन पक्षांची आघाडी बनण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
दोन रुपयांचा चेक मिळालेल्या शेतकऱ्याची कृषीमंत्री दादा भुसेंनी लावली थट्टा; म्हणाले, मालेगावमध्ये…
‘आता फक्त एकच आशा उरलीय, ती म्हणजे..’; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं शिवसेनेचं भविष्य
पुण्याच्या गोल्डमॅनचा दीड कोटींचा सोन्याचा शर्ट लंपास: धक्कादायक माहिती आली समोर