दिल्ली | सध्या बिहार निवडणूकीचे वारे देशभर वाहत आहेत. पण आजच्या झालेल्या बिहार निवडणूकीच्या एक्झिट पोलच्या निकालाने भाजपला घाम फुटला आहे. कारण एक्झिट पोलनुसार भाजपच्या हातातून हे राज्य जाणार असे चित्र दिसत आहे.
कारण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष पुन्हा एकदा तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच नितीश कुमार यांना फक्त ४० जगांत समाधान मानावे लागणार आहे.
२४३ जागांची ही विधानसभा आहे. यामधील १२२ जागा मिळाल्या तर बहुमत मिळेल आणि हे बहुमत मिळवणे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला शक्य आहे अशी शक्यता आहे. सगळ्याच एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला १२० च्या वर जागा दाखवल्या आहेत.
ही निवडणूक त्रीशंकूही होऊ शकते. एबीपीच्या अंदाजानुसार भाजपला ६६-७४, JDU ला ३८-४६, RJD ला ८१-८९, काँग्रेसला २१-२९, LJP ला २, LEFT ६-१३, रालोसपला १-३ आणि अन्य ४-८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
टाइम्स नाऊच्या अंदाजानुसार NDA ला ११६ जागा, UPA ला १२० जागा आणि अन्य ७ जागा मिळतील. रिपब्लिक जण की बातच्या यानुसार NDA ला ९१ ते ११७ च्या दरम्यान जागा मिळतील तसेच MGB/UPA ला ११८ ते १३८ च्या दरम्यान जागा मिळतील आणि LJP ला ५ ते ८ च्या दरम्यान जागा, अन्य ला ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
२४३ जागांसाठी ही निवडणूक आहे.२८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान झाले होते. या एक्झिट पोलमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण यावेळेस नितीश कुमार यांच्यासोबत भाजपला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.