कोणताही खास व्यायाम न करता ‘ही’ साधी ट्रीक वापरून महिलेने कमी केले तब्ब्ल १९ किलो वजन

माणसाच्या आयुष्यात त्याच्या शरीराचे वजन कमी असणे अथवा वजन जास्त असणे ही आताच्या काळात एक समस्या आहे. लोक आजकाल वजनावर खूप चेष्टा करतात असे आपण देखील कित्येक वेळा पहिले असेल आणि अनुभवले देखील असेल.

शरीराचे अधिक प्रमाणात वाढलेले वजन घटवणे हे अतिशय कठीण काम असते. आपल्याला वर-वर जरी हे सोपे वाटले तरीदेखील वजन कमी करणे हे जिकरीचे काम आहे. महिलांमध्ये प्रसूतीनंतर वजन वाढण्याचे प्रमाण जास्त आहे.

प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात कष्ट घ्यावे लागतात. एक गृहिणी आणि दोन मुलांची आई असणाऱ्या अंशिका गुप्ता यांनाही वजन वाढण्याच्या (लठ्ठपणाच्या) समस्यांचा सामना प्रसूतीनंतर करावा लागला होता. प्रसूतीनंतर डॉक्टरांनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता.

त्यांनी मात्र डॉक्टरांचे बोलणे मनावर घेत आणि त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष न करता वजन नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय घेतला. प्रयत्न आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करू शकतो. अंशिका गुप्ता यांनी देखील असंच काहीतरी केलं.

वजन कमी करण्यासाठी अंशिका यांनी कोणत्याही प्रकारे खास वर्कआउट केले नाही . याऐवजी त्यांनी साधेसोपे वर्कआउट करण्यावर भर दिला . अंशिका नियमित एक तास ब्रिस्क वॉक आणि १५ मिनिटे योगासने करत असत .

फिटनेसकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास , कोणतीही गोष्ट अशक्य नाही , असेही अंशिकाने म्हटलं आहे. अंशिका यांनी १२ महिन्यात तब्बल १९ किलो वजन कमी केले . आता अंशिकाला इतर महिलांनाही फिटनेसप्रती प्रोत्साहित करण्याची इच्छा आहे .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.