आयपीएल च्या सध्याच्या हंगामातील ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघांमध्ये खेळला गेला. या थरारक सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यातील शेवटच्या षटकात गुजरात टायटन्स संघाला विजयासाठी ९ धावांची गरज होती. पण डॅनियल सॅम्सच्या भेदक गोलंदाजीसमोर डेव्हिड मिलर आणि रशीद खानला देखील कमाल करता आली नाही.(exciting-victory-for-mumbai-indians-video)
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघांमध्ये झालेला हा सामना रोमांचकारक ठरला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १७७ धावा केल्या. १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाची सुरुवात चांगली झाली.
गुजरात टायटन्स संघाची सलामी जोडी वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी मिळून १०६ धावांची शानदार भागीदारी केली. ऋद्धिमान साहाने आणि शुभमन गिलने शानदार अर्धशतक झळकावले. शुभमन गिलने ३६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची झंझावाती खेळी केली. तर वृद्धिमान साहाने ४० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या.
https://twitter.com/CricketIPL20/status/1522653813655891968?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522653813655891968%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketchamber.com%2Fgt-lost-match%2F
या सामन्यात गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली. तरी देखील गुजरात टायटन्स संघाला हा सामना ५ धावांनी गमवावा लागला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला विजयासाठी ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू डॅनियल सॅम्सच्या हातात सोपवला.
https://twitter.com/EdenWatson17/status/1522639882098974720?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522639882098974720%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketchamber.com%2Fgt-lost-match%2F
वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला आणि मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत असताना गुजरात टायटन्सचा डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरने एक धाव घेतली आणि स्ट्राईक
राहुल तेवतियाला दिली.
राहुल तेवतियाला डॅनियल सॅम्सने टाकलेला पुढील चेंडू खेळता आला नाही. डॅनियल सॅम्सने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर राहुल तेवतिया धावबाद झाला. त्यानंतर गुजरात टायटन्सचा रशीद खान फलंदाजीसाठी आला. परंतु पुढील चेंडूवर त्याला फक्त एक धाव घेता आली. त्यामुळे गुजरात टायटन्सला विजयासाठी २ चेंडूत ६ धावांची गरज होती. परंतु पुढील दोन चेंडूत गुजरात टायटन्सला फक्त एकच धाव मिळाली. अशारितीने मुंबई इंडियन्स संघाने हा सामना ५ धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या :-
भरमैदानात सूर्यकुमार यादवने घेतली व्हाएग्राची गोळी? व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ
‘राज्याचे केंद्राकडे नाही तर केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी’; केंद्रीय मंत्र्याने ठाकरेंना सुनावले
महागाईवरून संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, ‘युक्रेनचं राहू द्या, महागाईवर बोला..’