चंद्रकांत पाटलांच्या न्यायालयीन चौकशीच्या आदेशाने खळबळ; आमदारकी होऊ शकते रद्द

पुणे । भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. पुणे न्यायालयाने त्यांना दणका दिला आहे.

न्यायालयाने निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत.

पुणे न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी हे आदेश दिले आहेत. अभिषेक हरिदास यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोटी माहिती सादर केल्याचा आरोप केला होता.

तक्रार करत याबाबत पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

माझ्या विरुद्धातील तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली तथ्यहीन तक्रार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मात्र यामध्ये ते चांगलेच अडचणीत आले आहेत.

याप्रकरणी त्यांची आमदारकी देखील रद्द होवू शकते. विरोधकांनी देखील हा मुद्दा उचलून धरला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.