परीक्षा रद्द झाली म्हणून मुलाने काढले चंद्राचे फोटो; फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्यामुळे मुलांच्या परीक्षा पण रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुले घरी बसल्या बसल्या वेग वेगळे छंद जोपासत आहेत. असाच एक छंद पुण्यातील मुलाला अस्ट्रोफोटोग्राफीचा लागला आहे.

प्रथमेश जाजू नाव असलेल्या या तरुणाने चंद्राचे सुस्पष्ट आणि एकदम सुंदर छायाचित्र टिपले आहे. त्याने हे छायाचित्र सोशल माध्यमावर टाकल्यानंतर चंद्राचे सर्वात सुंदर छायाचित्र म्हणून त्याची गणना खगोलप्रेमींकडून केली जात आहे.

प्रभात रस्त्यावर राहत असलेला प्रथमेश ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा सभासद आहे. त्याने याबद्दल बोलताना सांगितले आहे की, काही लेख आणि युट्युबवर पाहून प्रोसेसिंग आणि इमेज कशा घ्यायच्या याची माहिती घेतली. त्याने त्याच्या जवळपास ५० हजार छायाचित्रे काढली.

जसा आपण मोबाईल मध्ये पॅनोरमा मूड मध्ये फोटो काढतो अगदी तसेच फोटो त्याने चंद्राचे काढायचा प्रयत्न केला. त्याने चंद्राच्या छोट्या भागाला झूम करून त्याचे छायाचित्र काढले. त्यानंतर त्याने छोटे छोटे व्हिडीओ काढले.

एका व्हिडिओमधून त्याला तब्बल २००० छायाचित्र मिळाली. या माध्यमातून त्याने जवळपास ३८ व्हिडीओ काढले. त्यानंतर त्याने व्हिडीओ प्रोसेस केले आणि त्यानंतर मग त्यांना एका छायाचित्र मिळाले.

त्याने दावा केला आहे की भारतात अशा पद्धतीने अजून तरी कोणी छायाचित्र काढलेले नाही. प्रथमेशला खगोल विभागात आणि ऍस्ट्रोफिजिक्समध्ये करिअर करायचे असल्यामुळे त्याने याच विभागात शिकण्याचे ठरवले आहे.

ताज्या बातम्या
परवीन बॉबीला भेटण्यासाठी आलेला विदेशी चाहता कसा बनला बॉलीवूडचा खलनायक? वाचा बॉब क्रिस्टोची कहानी

…म्हणून मनीषा कोईरालाने सुपरहिट चित्रपट ‘जुबेदा’ला दिला होता नकार

आता घरातच करा कोरोना टेस्ट, पुण्यात लागला किटचा शोध, मान्यताही मिळाली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.