मोकळ्या झोपड्यांत घुसले जवान पण तिथेही टाकलं होतं जाळं; वाचा कसे झाले २२ जवान शहीद

मुंबई : छत्तीसगडच्या बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांची चकमक झाली. यात नऊहून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवांना यश आलं असली तरी या चकमकीत २२ जवान शहीद झाले आहेत. २५० नक्षलवाद्यांशी सामना करताना जवानांनी पाच तास झुंज दिली.

नेमकं छत्तीसगडमध्ये काय घडलं? याबद्दल आता आपण अधिक जाणून घेऊयात. माओवाद्यांनी छत्तिसगढमधील विजापूर येथे सुरक्षा दलावर हल्ला करण्यासाठी लाईट मशिन गन्स आणि अंडर बॅरेल ग्रेनेड लॉंचर आणि देशी रॉकेटचा वापर केला होता, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

२० दिवसांपूर्वीच कुख्यात नक्षलवादी हिडमा या जंगलात लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. नक्षलवादी शस्त्रसाठा घेऊन येथे लपल्याने त्यांना पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता . मात्र नक्षलवाद्यांनीच जवानांना ‘U’ चक्रव्यूहात फसवले.

धक्कादायक बाब म्हणजे यात २५ जवान शहीद झाले आहेत. तर २३ हून अधिक जखमी झाले आहेत. पण जवानांनीही नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देत १० जणांचा खात्मा केला. मात्र नक्षलवाद्यांच्या ‘U चक्रव्यूहात अडकलेल्या जवानांना त्यातून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

दरम्यान, जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना शोधून काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी खास मोहीम आखली होती. त्यानुसार तब्बल २००० जवानांच्या तुकड्या करण्यात आल्या होत्या. प्रत्येक तुकडी वेगवेगळ्या मार्गाने जंगलात शिरली होती. एक एक तुकडी जंगलात प्रवेश करत होती. मात्र जवान जंगलात आल्याची चाहूल नक्षलवाद्यांना लागली.

नक्षलवाद्यांनी जवानांना दाट जंगलात येऊ दिले. हिडमाच्या कमांडरनी ‘U चक्रव्यूह आखले. जवान आपल्या जाळ्यात अडकल्याचे बघितल्यावर नक्षलवाद्यांची बटालियन जवानांवर तुटून पडली. एकाच वेळी मोठ्या संख्येने नक्षलवादी पुढे आल्याने जवानही थोडे हैराण झाले. याचे कारण असे की, त्यांच्या माहितीप्रमाणे नक्षलवादी दाट जंगलात व गावात लपले होते.

दरम्यान, या चकमकीत बचावलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३५० सशस्त्र माओवादी आणि त्यामध्ये २५० सहानुभुतीदार कोब्रा, डिआरजी आणि एसटीएफच्या ४०० जणांच्या पथकावर तुटून पडले. माओवाद्यांचीही जीवितहानी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘जनतेने १०० टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी द्यावी’

तुम्ही निवडणूक जिंकायच्या कॅटेगरीत बसत नाही म्हणत पवारांनी नाकारले होते तिकीट; आज गृहमंत्री केलं

…आणि हिडमाच्या ‘U’ चक्रव्यूहात जवान फसले; वाचा नक्षलवाद्यांनी कसं घेरलं सैनिकांना

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.