अनुरागवरच्या बलात्काराच्या आरोपांवर त्याची घटस्फोटीत बायको कल्की कोचलीन म्हणते..

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. २०१४-१५ साली अनुराग कश्यपला आपण भेटलो त्यावेळी दारूच्या नशेत त्याने आपल्यासह जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे पायलने सांगितले आहे.

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचे खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा,’ असे ट्विट पायलने केले होते.

याचाच धागा पकडत अनुरागला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या पहिल्या पत्नीने देखील त्याला सपोर्ट दिला होता. आता अनुरागची दुसरी बायको कल्की कोचलीन देखील त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरली आहे.

अनुरागची बाजू मांडत कल्कीने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. या मध्ये तिने म्हंटले आहे की, “डिअर अनुराग, तू कायमच महिलांना आपल्या लिखानामधून सपोर्ट केला आहे. तू कायम त्यांच्या सोबत उभा राहिला आहेस. तू मला कधी स्वतःपेक्षा कमी समजले नाहीस,असे तिने म्हंटले आहे.

पुढे कल्की म्हणतीये, आपल्या घटस्फोटानंतरही तू मला कायम आदर, सन्मान दिला, असं तिने पोस्टमध्ये म्हंटले आहे.

View this post on Instagram

@anuragkashyap10

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

याचबरोबर ‘जिथे प्रत्येक जण एकमेकांना खोट पडत आहे. अशा वेळी अस्तित्व काय आहे हे तुला चांगलेच ठाऊक आहे. बिंधास्त रहा आणि जे करत आहे ते करत रहा..,’ असे तिने म्हंटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.