Share

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरून मतदानासाठी दाखल; सोशल मीडियावर हळहळ

आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. यादरम्यान भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग(Manmohan Singh) यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(Ex-Prime Minister Manmohan Singh entered the polling station from wheelchair)

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज मतदान केले आहे. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअर बसून मतदानासाठी आले होते. यावेळी मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकांचा आधार घेत मतदान केले.

मागील काही महिन्यांपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत ठीक नाही. मागील वर्षी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना प्रकृतीच्या कारणास्तव एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती.

२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमध्ये झाला. मनमोहन सिंग यांनी पंजाब विश्वविद्यालयातून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

त्यानंतर मनमोहन सिंग यांनी पुढील शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. केम्ब्रिज विद्यापीठामधून मनमोहन सिंग यांनी पी. एचडी केली आहे. मनमोहन सिंग यांनी ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अँड प्रोस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथ’ या नावाने पुस्तक देखील लिहिले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाब विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे.

१९७१ मध्ये मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली आहे. मनमोहन सिंग रिझर्व्ह बँकेमध्ये गव्हर्नर देखील होते. याशिवाय मनमोहन सिंग योजना आयोगाचे उपाध्यक्ष देखील होते. पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
महाराष्ट्राची एसटी नर्मदा नदीत कोसळून १३ प्रवाशी ठार; अपघाताचे भीषण फोटो आले समोर
पुर्वी मला फक्त मोदी आवडायचे पण धर्मवीर पाहील्यापासून मला…; चिमुकलीचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा संवाद व्हायरल
‘मलाही गुवाहाटीला न्या’, चिमुकलीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हट्ट

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now