कपड्यांप्रमाणे हा माजी मंत्री बदलतो बायको, कारनामे ऐकून बसेल धक्का

समाजात अनेकजण हे अनेकदा लग्न करतात. मात्र त्याला वेगवेगळी करणे आहेत. काहीजण मात्र फसवणूक करतात. आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील पोलीस ठाण्यात ६ लग्न करणारे माजी मंत्री चौधरी बशीर यांच्याविरोधात तीन तलाकचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे हा गुन्हा त्यांची चौथी पत्नी नगमा हिने दाखल केला आहे. माजी मंत्री कपड्यांप्रमाणे बायको बदलत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय माजी मंत्र्यांवर आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सुरुवातीला २०१२ मध्ये नगमा यांनी चौधरी बशीर यांच्यासोबत विवाह केला. लग्नानंतर त्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.

त्यांनी तिला त्रास दिला, जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवले. या प्रकरणी चौधरी बशीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये तो तुरुंगातही होते. आरोप करणाऱ्या नगमाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. यामध्ये गंभीर आरोप आहेत. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता.

आता चौधरी बशीर पुन्हा लग्न करणार असल्याचे तिला समजले. ती त्याच्याकडे गेली, पण तिथून तिला तीन वेळा तलाक सांगून काढून टाकण्यात आले. नगमा म्हणाली की, तिने शाहिस्ता नावाच्या महिलेशी सहावे लग्न केले आहे. माजी मंत्री आधीच विवाहित आहे आणि तिचा तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट देखील झालेला नाही.

चौधरी बशीर यांनी कानपूरमधील आमदार गजाला यांच्यासोबत प्रेम विवाह केला होता. दोघांना एक मुलगाही आहे. नंतर दोघांचा तलाक झाला. नगमाने सांगितले की, दुसरे लग्न गिन्नी कक्कंड हिच्यासोबत हिंदू पद्धतीने झाले. तिसरे लग्न दिल्लीतील तरन्नूमसोबत झाले आणि चौथे तिच्यासोबत. त्याने पाचवे लग्न रुबीना नावाच्या मुलीशी केले.

यामुळे या मंत्र्याने एकूण सहा लग्न केली आहेत. अखेर माजी मंत्र्यांविरोधात मुस्लीम महिला संरक्षण अधिनियम तीन तलाक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता या माजी मंत्र्याला मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

पुण्याच्या वेदीकाचा मृत्यूच्या काही तासांपूर्वीचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर, पहा हृदय पिळवून टाकणारा व्हिडिओ…

सिंधूला कार भेट देण्याची चाहत्याची मागणी, आनंद महींद्रांच्या उत्तराने मागणी करणारा गपगार

इंडिअन आयडल १२: पवनदीप, अरुणीता, षण्मुखप्रिया यांना मिळाले २० गाण्यांचे कॉन्ट्रेक्ट; ट्रॉफी जिंकण्याआधीच लागली लॉट्री..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.