Share

‘…तर मला फाशी द्या’, काश्मिरी पंडितांच्या पलायनाबाबत फारुख अब्दुलांचं मोठं विधान

farook.

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने तिकीटबारीवर देखील चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटावरून राजकीय पक्ष देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.(ex chief minister farukh abdulla big statement on kashmiri pandit escape incident)

काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी जम्मू-काश्मीरचे(Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला जबाबदार आहेत, असा आरोप सध्या केला जात आहे. यावर फारूक अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी या घटनेसाठी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले आहेत.

एका मुलाखती दरम्यान फारूक अब्दुल्ला यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, “जेव्हा तुम्ही या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन कराल. त्यावेळी या घटनेला कोण जबाबदार आहे ते तुम्हाला कळेल. जर फारूक अब्दुल्ला जबाबदार असेल, तर मला फाशी द्या. पण जे लोक जबाबदार नाहीत त्याना कोणत्याही पुराव्यांशिवाय दोष देऊ नका.”

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले की, “मी या घटनेला जबाबदार नाही, असे मला वाटते. लोकांना या घटनेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी त्यावेळचे इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख किंवा केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी संवाद साधायला हवा”, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले आहे.

या घटनेबाबत बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, “१९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांचेच नव्हे तर काश्मीरमधील शीख आणि मुस्लिमांचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन केले पाहिजे. त्यावेळी माझे आमदार, मंत्री आणि कार्यकर्त्यांना त्या लोकांच्या शरीराचे तुकडे झाडाच्या बुंध्यावरून उचलावे लागले होते, अशी गंभीर परिस्थिती होती.”

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १७५ कोटींची कमाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
क्लायमॅक्सचा सीन शूट करताना ढसाढसा रडली अभिनेत्री, वाचा ‘द काश्मीर फाइल्स’ च्या सेटवर काय घडलं?
पेट्रोलचे भाव गगणाला भिडणार, 115 रुपये प्रतिलिटरने मिळणार पेट्रोल, पंपांवर लांबच लांब रांगा
उद्धव ठाकरेंभोवती ईडीने फास आवळला, मेहुण्याची कोट्यवधींची संपत्ती जप्त; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now