थोबाड सगळ्यांना रंगवता येते, दरेकरांचा रुपाली चाकणकरांवर जोरदार हल्लाबोल

पुणे । विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असे म्हणत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर नाव न घेता टीका केली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले होते.

‘तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असे त्यांनी म्हटले होते.

त्यांना आता प्रवीण दरेकर यांनी जोरदार उत्तर दिले आहे, दरेकर म्हणाले की, थोबाड सर्वांना रंगवता येते. त्यामुळे अशा प्रकराचे अतिरेकी भाषण करणे योग्य नाही. माझे नीट वक्तव्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. वड्याचे तेल वांग्यावर काढायचे आणि प्रसार माध्यंमात काहीतरी पाहिजे म्हणून असे काही तरी बोलायचे यामुळे प्रसिध्दी मिळते, असे दरेकर म्हणाले.

तसेच मी त्यांना महत्त्व देत नाही, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. प्रवीण दरेकर आपण विरोधीपक्ष नेते आहात. पण, तुमच्या वैचारिकत्ता आणि अभ्यासाशी दूर दूर काही संबंध नाही. प्रवीणजी तुम्ही आणि तुमच्या पक्षात महिलांबद्दल नेहमी दुय्यम वागणूक देण्याची परंपरा आहे.

तुम्ही ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला होता. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे प्रवीण दरेकर यांनी हे वक्तव्य केले होते. यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली. याला आता प्रवीण दरेकर यांनी देखील जोरदार उत्तर दिले आहे. यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.