उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार; प्रदीप शर्मादेखील तुरुंगात जाणार- किरीट सोमय्या

मुंबई। अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरण हत्या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे चौकशीच्या गुंत्यात अडकले असून पहाटे NIAच्या पथकानं सकाळी सहाच्या सुमारास शर्मा यांच्या घरी छापेमारी केली आहे. दरम्यान, शर्मा यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचाबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्यानंतर प्रदीप शर्मादेखील तुरुंगात जाणार असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याच बरोबर किरीट सोमय्या यांनी यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका करताना उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जाणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. एनआयए कार्यालयात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. व त्यानंतर सचिन वझे व मनसुख हिरेन हत्या प्रकरण चांगले गाजले होते.

व त्यावरून राजकारण ढवळून निघाले होते मात्र आता वाझेयांच्यासंपर्कात प्रदीप शर्मा होते, असं एनआयएतील सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या
तुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंनी सेनेला डिवचले
‘कानफाडात मारण्यासाठी हात तयार ठेवा’ किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा
अभिनयापासून दुर जाऊन ‘हे’ काम करते सलमान खानची ‘रेड्डी’ चित्रपटातील अभिनेत्री
मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या रडावर, अटकेची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.