…म्हणून ऐश्वर्या राय नेहमी आराध्याचा हात पकडून असते

जगातील प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी खुप प्रोटेक्टिव्ह असतात. आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी होऊ नये. म्हणून ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. बाहेर गेल्यानंतर आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी ते सगळे प्रयत्न करतात.

ही गोष्ट फक्त सामान्य लोकच करत नाहीत. तर बॉलीवूडचे सुपेरस्टार्स देखील या सर्व गोष्टी करतात. आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी ते अनेक गोष्टी करत असतात. याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन.

ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केले होते. चित्रपटाच्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या कुटुंबाची सुन झाली.

लग्नानंतर ऐश्वर्याला २०११ मध्ये एक मुलगी झाली. त्या मुलीचे नाव आराध्या ठेवण्यात आले. आज आराध्या ९ वर्षांची झाली आहे. ऐश्वर्या सगळीकडे तिच्यासोबत आराध्याला घेऊन जात असते. एक खास गोष्ट म्हणजे ती प्रत्येक वेळेस आराध्याचा हात धरून असते.

ऐश्वर्या आराध्याला घेऊन अनेक ठिकाणी जात असते. पण कुठेही जात असताना ऐश्वर्या प्रत्येक वेळी आराध्याचा हात पकडते. ती कधीच तिचा हात सोडत नाही. त्यामुळे ऐश्वर्या असे का करते असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो.

आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. ऐश्वर्याला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते की, तुम्ही प्रत्येक मुलीचा हात का पकडतात? यामागे काही खास कारण आहे का? यावर ऐश्वर्याने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे.

ऐश्वर्या म्हणाली की, ‘आराध्याचा जन्म एका अभिनेत्याच्या घरी झाला आहे. ज्यामुळे खुप लहान वयातच तिला कॅमेराचा सामना केला आहे. आम्ही जेव्हा पण बाहेर जातो. तेव्हा मीडियाचे कॅमेरे आमच्या अगोदर तिथे उपस्थित असतात. त्यामुळे तिथे खुप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते’.

ती पुढे म्हणाली की, ‘सध्या अनेक वाईट गोष्टी होत आहेत. अनेक वाईट व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. त्या सर्वांपासून माझ्या मुलीचे रक्षण करण्यासाठी आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठी मी नेहमी तिचा हात पकडून असते. तिला कधीच एकटीला सोडत नाही’.

ऐश्वर्याला तिच्या मुलीची खुप जास्त काळजी आहे. ज्यामुळे ती नेहमीच तिचे संरक्षण करत असते. त्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी आराध्याचा हात पकडत असते. ऐश्वर्यासोबतच अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन देखील कधीच आराध्याला एकटीला सोडत नाहीत. नेहमीच तिचा हात पकडून असतात.

ऐश्वर्या राय बॉलीवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. तिने १९९९ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. ऐश्वर्या मिस वर्ल्ड देखील आहे. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर खुप कमी वेळात तिने यश मिळवले होते.
तिने बॉलीवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सलमान खानसोबत काम करायला बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने दिला होता नकार

अलका कुबलच्या मुलींचे फोटो पाहून थक्क व्हाल; सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना देतात टक्कर

घटस्फोटाच्या आदल्या रात्री मलायकासोबत ह्या धक्कादायक गोष्टी घडल्या होत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.