Share

Priyanka Gandhi : दरवेळी गांधी परिवारावर टीका करता, 11 वर्षे तुमची सत्ता, आतातरी स्वत:ची जबाबदारी घ्या; प्रियांका गांधींचा भाजपवर घणाघात

Priyanka Gandhi on Operation Sindoor : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी लोकसभेत केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) प्रकरणात थेट जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली. त्यांच्या मते, भाजप (BJP) सत्तेत येऊन 11 वर्षे झाली तरी ते अद्याप गांधी-नेहरू घराण्यावर दोषारोप करण्यातच वेळ घालवत आहेत. “इतिहास उगाळत बसा, पण मी वर्तमानात जगणारी आहे” असे प्रियांका गांधी यांनी ठणकावले.

लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसच्या कारभारातील चुका, पाकव्याप्त काश्मीर आणि चीनकडून भूभाग गमावण्याचे मुद्दे उपस्थित केले. यावर प्रत्युत्तर देताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, सरकारने ऐतिहासिक गोष्टींवर भाष्य करण्याऐवजी एप्रिल महिन्यात बैसरन खोऱ्यात (Baisaran Valley) झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत उत्तर द्यावे.

“पहलगाम हल्ला कसा झाला, जबाबदारी कोणाची?”

प्रियांकांनी विचारलं 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम (Pahalgam) परिसरात 26 जणांना ठार मारणारा हल्ला कसा घडला? केंद्र सरकारने वारंवार जाहीर केले की, काश्मीरमध्ये शांतता आहे, दहशतवाद संपला आहे. मग पर्यटकांनी भरलेल्या या भागात अशा प्रकारचा हल्ला कसा झाला? त्यांच्यानुसार, जर सरकारकडे हल्ल्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा नव्हती, तर हा थेट सुरक्षा यंत्रणांचा अपयश आहे. “या हल्ल्यानंतर गुप्तचर खात्याचे प्रमुख किंवा गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का?” असा सवाल त्यांनी केला.

शुभम द्विवेदी प्रकरणाचा उल्लेख

प्रियांकांनी कानपूर (Kanpur) येथील रहिवासी शुभम द्विवेदी (Shubham Dwivedi) यांचा उल्लेख केला. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. ते पत्नीसमवेत काश्मीरला पर्यटनासाठी गेले असताना बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी त्यांना ठार केले. त्या दिवशी बैसरनमध्ये पर्यटक मजेत फिरत होते, काहीजण झिपलाईन करत होते. शुभम आणि त्यांची पत्नी एका स्टॉलजवळ उभे असतानाच जंगलातून अचानक दहशतवादी आले. त्यांनी शुभमला गोळ्या घालून ठार केले आणि पुढील एक तास पर्यटकांचा शोध घेऊन हत्या केली.

“सरकारने नागरिकांना रामभरोसे सोडलं”

शुभम यांच्या पत्नीच्या मते, “त्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नव्हता. सरकारने आम्हाला पूर्णपणे असुरक्षित सोडलं. जर हा पर्यटकांचा लोकप्रिय भाग असेल, तर तिथे किमान एक तरी जवान असायला हवा होता. प्राथमिक उपचाराची सोय सुद्धा नव्हती.”

प्रियांका गांधी म्हणाल्या की, हा नागरिकांच्या सुरक्षेवरील गंभीर प्रश्न आहे आणि याची जबाबदारी पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी घ्यावी. त्यांनी हेही लक्षात आणून दिले की, हल्ल्याच्या दोन आठवडे आधीच गृहमंत्री काश्मीर दौर्‍यावर गेले होते, सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी. मग ही शोकांतिका का टळली नाही?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now