“हिंसाचाराचं समर्थन करणारा प्रत्येक भारतीय दहशतवादीच”, दिल्ली हिंसाचारावर कंगना पुन्हा बरळली

दोन महिन्यांपासून कृषी कायदे रद्द् करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या सर्व प्रकारानंतर अभिनेत्री कंगणा रणौतने आंदोलक शेतकऱ्यांवर सडकून टिका केली आहे. तिने म्हटले की, “मी जेव्हा शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले होते तेव्हा माझे सहा ब्रँडसोबत असलेले करार मोडले होते. त्यानंतर मला ब्रँड एम्बेसेडर म्हणून कमी केले. आज शेतकऱ्यांनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला त्या हिंसाचाराला ज्या प्रत्येक भारतीयाने सपोर्ट केला आहे ते सर्व दहशतवादी आहेत. त्यामध्ये त्या देशविरोधी ब्रँडचाही समावेश आहे”. असं कंगणा रणौत म्हणाली.

दरम्यान कंगणाकडून अशी बेजबाबदार वक्तव्य सतत करण्यात येत आहेत. कंगणाच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नकलीपणाच्या ‘त्या’ आरोपावर रोहित पवारांचे निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
शेतकऱ्यांचं आंदोलनाबाबत रामदास आठवले यांचं खळबळजनक विधान, म्हणाले…
शाळेत डान्स करता करता अभिनय क्षेत्रात पोहोचली ‘ही’ अभिनेत्री; एअरपोर्टवर घालावल्या आहेत अनेक रात्री
‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’; पहा वरुण धवनच्या लग्नाचे सुंदर फोटो…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.