१९८३ च्या एन्काऊंटर बॅचचे नाव घेतले तरी आजही मुंबईतील अंडरवर्ल्डचा थरकाप उडतो; कारण..

गोष्ट आहे १९८३ सालची. एका पोलिस अधिकाऱ्याची पोस्टिंग पोलीस अकादमीमध्ये करण्यात आली होती. लाईन ऑफ ऍक्शनच्या ऐवजी दुसऱ्याच जागी बदली झाल्याने सगळे पोलीस आधीपासूनच नाराज झाले जाते. अशा वेळेस अरविंद इनामदार यांनी नाशिक अकादमी जॉईन करताच सगळ्यांना विश्वासाने सांगितले की, आपण अशी मुलं तयार करू ज्यांच नाव ऐकलं तरी कोणत्याही गुंडाचा थरकाप उडाला पाहिजे.

इनामदार यांनी मुलांना ट्रेनिंग दिली आणि सगळ्यात शेवटी सांगितले की, आता असे काम करा की अंडरवर्ल्डने तुमचं नाव ऐकलं तरी त्यांचा थरकाप उडाला पाहिजे. ही होती आतापर्यंतची सगळ्यात घातक १९८३ ची पोलीस अधिकाऱ्यांची बॅच. त्या काळी सगळ्यात जास्त गुंडांचा खात्मा याच बॅचने केला होता.

त्या काळात मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा खूप होता. मुंबईच्या रस्त्यावर शूटआऊट किंवा मर्डर किरकोळ गोष्ट झाली होती. हे चित्र आता बदलायला हवे होते. पण जेव्हा ‘८३ ची बॅच मुंबईमध्ये आली तेव्हा त्यांनी ५०० पेक्षा जास्त एन्काऊंटर केले होते.

त्याच बॅच मधील प्रदीप शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी त्या काळची सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, या बॅचला पूर्ण देशात वेगवेगळ्या नजरेने पाहिले जाते. आमच्या बॅचबद्दल बोलले जाते की, आम्हीच मुंबईतील अंडरवर्ल्डची कंबर मोडली होती. मी स्वतः दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला पकडले होते.

तुमच्या माहितीसाठी १९८३ ला ज्या बॅचमध्ये प्रदीप शर्मा होते त्याच बॅचमध्येच विजय साळसकर सारखे दमदार पोलीस अधिकारी होते. विजय साळसकर १२ वर्षांपूर्वी २६/११ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. तसेच प्रफुल्ल भोसले, रवींद्र आंग्रे आणि सुधाकर पुजारी यांसारखे नावाजलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट होते.

प्रदीप शर्मा पुढे म्हणाले, आमच्या बॅचच्या अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये सर्वात जास्त एन्काऊंटर केले होते. त्यामुळे आमच्या बॅचमधल्या अधिकाऱ्यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट बोलले जात असायचे. मी आणि माझ्या बॅचमधल्या साथीदारांनी मिळून ५०० पेक्षा जास्त एन्काऊंटर केले आहेत. फक्त माझ्या नावावर त्यातले ११३ एन्काऊंटर आहेत.

या एन्काऊंटरचा प्रभाव मुंबईत खूप लांबपर्यंत पसरला. मुंबईमध्ये पसरलेल्या अंडरवर्ल्डची दहशत कमी झाली आणि मोठे मोठे डॉनसुद्धा ‘८३ च्या बॅचला घाबरू लागले. छोटा राजन पासून दाऊदपर्यंत आणि अमर नाईकपासून अरुण गवळीपर्यंत यांच्या कानावर जरी आमचे नाव पडले तरी त्यांची पळता भूई होत असे.

आजच्या काळात जर मुंबई अंडरवर्ल्डपासून मुक्त आहे त्याचे सगळ्यात जास्त श्रेय ‘८३ च्या बॅचला जाते. पण ही गोष्ट जास्त कोणाला माहीत नाही. पण प्रदीप शर्मा आपल्या बॅचला फक्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट नव्हते म्हणत. त्यांची परिभाषा वेगळी होती. त्यांचे म्हणणे होते की, एन्काऊंटर केले जात नाहीत ते होतात. ते सर्व अपघात आहेत, अचानक होतात.

आम्ही फक्त एन्काऊंटर नाही केले आम्ही हजारो आरोपींना मकोका, पोटाझ, टाडा ऍक्टच्या अंतर्गत पकडले होते आणि तुरुंगात टाकले होते. प्रदीप शर्मा यांनीच अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूडचे संबंध जगासमोर आणले. अरविंद गुप्ता जेव्हा मुंबईचे जॉईंट सिपी होते तेव्हा त्यांनीच अरुण गवळीला अटक केली होती.

१९८३ ला मुंबईमध्ये दाऊदच्या विरोधात सगळ्यात जास्त ऑपरेशन झाले. त्यावेळी दाऊदच्या एका शूटरला सोडण्यासाठी दाऊदच्या एका चमच्याचा फोन आला. तो म्हणाला, मी डी कंपनीचा माणूस आहे. त्यावर पोलीस अधिकारी म्हणाला, मी पण डी कंपनीचा माणूस आहे पुन्हा इथे फोन केला तर सोडणार नाही.

अशी होती १८८३ ची बॅच. यानंतर मुंबईमध्ये गुन्हे खूप कमी झाले. कारण आता अंडरवर्ल्डला कळले होते की, मुंबई पोलिसांचा दबदबा काय असतो. त्यावेळी मुंबई पोलिसांनी खऱ्या अर्थाने आपली ताकद काय असते ते दाखवले होते. त्यानंतर आजपर्यंत अशी एकही बॅच जन्माला आली नाही. खऱ्या अर्थाने मुंबई पोलिसांचे नाव त्यानंतरच जगभर प्रसिद्ध झाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.