Share

२४ तास एसी, कूलर, पंखे चालवूनही वीज बिल निम्म्यावर येणार, वापरा ‘या’ खास Tricks

सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यामुळे AC , कुलर आणि फॅनचा वापर वाढला आहे. या उपकरणांचा वापर केल्यास आपल्याला काही प्रमाणात दिलासा मिळतो. पण विजेच्या बिलामध्ये देखील वाढ होते. आता आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे विजेच्या बिलात मोठी कपात होईल.(Even if you run AC, cooler, fan for 24 hours, your electricity bill will be halved, use these special tricks)

फॅनमध्ये केवळ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचा वापर करा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सामान्य लोकांच्या घरात सर्वात जास्त फॅनचा वापर केला जातो. त्यामुळे या दिवसांमध्ये फॅन बिघडण्याचे प्रमाण देखील जास्त असते. त्यासाठी फक्त इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचा वापर करायला हवा. फॅनमध्ये काही बिघाड झाल्यास, त्याची दुरुस्ती करा.

तसेच कूलरचे पंखे नीट साफ करून पंपाचे ऑइलिंग-ग्रीसिंग करा. भारतामधील अनेक घरांमध्ये सध्या कुलर वापरला जातो. कुलर बिघडू नये म्हणून त्याची योग्यवेळी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. कुलरच्या पंख्याचे आणि पंपाचे ऑइलिंग-ग्रीसिंग करणे आवश्यक आहे. कुलर खूप जास्त वेळ चालत असेल तर पंपाकडून मोठ्या प्रमाणात वीज ओढली जाते.

याव्यतिरिक्त योग्यवेळी कुलरचा पंखा, कंडेन्सर आणि रेग्युलेटरमध्ये बदल करावा. इलेक्ट्रोनिक रेग्युलेटरचा वापर केल्यास वीज कमी खर्च होते. उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिसमध्ये किंवा घरात एसीचा वापर केला जातो. पंख्यापेक्षा एसीला जास्त वीज लागते. नेहमी लक्षात ठेवा की, एसी चालू असताना पंखा देखील सुरु ठेवा.

एसीचे तापमान नेहमी २४ ते २६ अंशांच्या दरम्यान सेट करा. एसीचे एअर फिल्टर दर १० ते १५ दिवसांनी स्वच्छ करून घ्या. फिल्टरमध्ये धूळ साचल्यास थंडावा मिळत नाही. त्यामुळे आपल्याला एसी बराच वेळ चालू ठेवावा लागतो. नेहमी लक्षात ठेवा की, एसी चालू असताना खिडक्या-दारे बंद करा. खिडक्या-दारे बंद न ठेवल्यास एसीची थंड हवा बाहेर जाईल आणि खोली थंड होऊ शकणार नाही.

महत्वाच्या बातम्या :-
सहा दिवसांत बंद पडली ओलाची स्कूटर, बीडच्या तरुणाने गाढवाला बांधून काढली स्कूटरची धिंड
नवनीत राणांना पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपांवर गृहमंत्री स्पष्टच बोलले, म्हणाले…
भाजपा लागला २०२४ च्या निवडणूकांच्या तयारीला; जाणून घ्या काय आहे भाजपचा मास्टर प्लॅन….

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now