Har Har Mahadev : सध्या सर्वत्र ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाविषयी तक्रार करण्यात आली असून यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
‘हर हर महादेव‘ हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा या चित्रपटात सांगितली आहे.
मात्र, आता बांदल वंशजांनी या चित्रपटात चुकीचा इतिहास सांगितला असल्याची तक्रार केली आहे. सरदार कृष्णाजी राजे बांदल देशमुख यांनी ही तक्रार केली आहे. त्यांनी याबाबत एक पत्रदेखील दिले आहे. हा चित्रपट चुकीच्या इतिहासावर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पत्रात ते म्हणाले की, “प्रभू रामाला जसे हनुमंत होते तसे शिवबाला हा बाजी” हे वाक्य राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत असलेल्या निशिगंधा वाड यांच्या तोंडून टिझरमध्ये आले असून ते इतिहासाला धरून नाही. तसेच “हनुमंत अंगद रघुनाथाला, जेधे बांदल शिवाजीला” हे वर्णन जेधे मध्ये नमूद आहे,” असे ते या पत्रात म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी लिहिले की, ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे जाही सरदार येऊन संबंधित दुसऱ्या सरदाराकडे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी बाजीप्रभू देशपांढे यांची मागणी करतात. टीप – बारा मावळ मध्ये बाजीप्रभू देशपांडे हे हिरडस मावळातील सरदार ‘बाजी बांदल देशमुख’ यांच्या दरबारी पिढीजात ‘देश कुलकर्णी’ म्हणून आपले काम बजावत होते, असेही त्यांनी सांगितले
तसेच काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचा उल्लेख सरनोबत असाही आढळतो. त्यामुळे ट्रेलरमध्ये तुम्ही कोणते पात्र दाखवले आहे?. असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेले बाजीप्रभू यांच्या तोंडी मला शिवाजी शहाजी भोसले यांचा जीव घ्यायचा आहे, ही वाक्य इतिहासाचे विकृतीकरण करणारे आणि इतिहासाला काळीमा फासणारे आहे. तसेच जनतेची दिशाभूल करणारे आहे, असेही ते यात म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, दिग्दर्शक आणि लेखक धंदा करण्याच्या नादात जो चुकीचा इतिहास दाखवत आहेत, त्यामुळे समस्त इतिहास प्रेमींच्या आणि बांदल घराण्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ट्रेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे एकमेकांशी लढताना दाखवले आहेत. त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही.
लढाईमधील संवाद ‘मी बरे आणि माझे बांदल बरे’ हा बाजीप्रभूंना स्वराज्यद्रोही ठरवतो. टीप – शहाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य कार्य आरंभले होते, त्या काळातच बांदल घराणे महाराजांसोबत स्वराज्यात सामील झाले होते,” असेही या पत्रात लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
Har har mahadev : साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीही झाला हर हर महादेवचा फॅन, म्हणाला, मला खुप
Marathi Movies : ‘शिवाजीराजं आग आहेत त्या आगीशी खेळू नकोस’; हर हर महादेवचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा व्हिडीओ
‘हर हर महादेव, अब तांडव होगा’; राष्ट्रवादीचा कोणता बडा नेता जाणार जेलमध्ये?
हर हर महादेव म्हणत पावनखिंड चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित; पहा इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक