शिवप्रतिष्ठानमध्ये फुट! संभाजी भिडे गूरूजींच्या निकटवर्तीयाने केली नव्या संघटनेची स्थापना

सातारा | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांचे विश्वासू नितीन चौगूले यांची काही दिवसांपुर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. वर्षभरापासून त्यांच्या विरोधात तक्रारी येत असल्याने स्वत: भिडे गुरूजींनी कारवाई केली होती.

नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. त्यांच्या नव्या संघटनेचे नाव ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्थान’ असं आहे. सामाजिक कार्य करून संपुर्ण राज्यभर संघटनेचा विस्तार करणार असल्याचं नितीन चौगुले यांनी यावेळी सांगितले.

नितीन चौगुले म्हणाले, “शिवप्रतिष्ठानमधून माझं निलंबन करण्यात आले. यावर कोणतेचं कारण संघटनेकडून देण्यात आलं नाही म्हणून मी शिवप्रतिष्ठानमधील नाराज धारकऱ्यांना घेऊन नव्या संघटनेची स्थापना केली आहे. गुरूजींचे विचार देशासमोर मांडण्यासाठी नव्या संघटनेची स्थापना केली आहे”.

तसेच ते पुढे म्हणाले की, गुरूजींच्या शिवप्रतिष्ठानमध्ये असे काही लोक आहेत की जे चुकीची कामं करतात. या लोकांनीच भिडे गुरूजींना माझ्याबद्दल खोट सांगत माझे निलंबन करायला लावले आहे.

“संघटनेतून कोणतेही कारण न देता निलंबन करणाऱ्यांमध्ये मी एकटाच नाही. असे अनेकजण आहेत की ज्यांना संघटनेतून निलंबित केले आहे. त्यामुळे मी शिवभक्तांना आणि महाराष्ट्रातील धारकऱ्यांना सोबत घेऊन नव्या संघटनेची स्थापना केली आहे”.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी वादात सापडले होते. तेव्हापासून त्यांच्या संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत होता.
महत्वाच्या बातम्या-
‘मोदी सरकारने डिझेलच्या करातून कमावलेले २१ लाख कोटी कमावले’
पूजा चव्हाण आत्मह.त्या! पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच तृप्ती देसाईं जोडले हात अन्…
नवा स्ट्रेन कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा करु शकतो बाधित; एम्स प्रमुखांनी दिला इशारा
पेट्रोलने शंभरी गाठलीय, खरेदी करा दमदार आणि आकर्षक लूकमधील ‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर  

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.