राज्य सरकारचा मोठा निर्णय! अत्यावश्यक सेवेतील दुकाने आता फक्त ‘या’ वेळेत उघडी राहणार

राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णसंख्या वाढीमुळे आरोग्य यंत्रेणेवर ताण येताना दिसून येत आहे.

त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. तसेच राज्य सरकारने काही निर्बंध घातले असून राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदी केली आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने आता पुन्हा एकदा नवीव नियमावली जाहीर केली आहे.

आता राज्य सरकारकडून आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण, मासे विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ च्या वेळेतच सुरु ठेवता येणार आहे. तसेच लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहे.

आता लागू केलेल्या नियमांनुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच उघडी ठेवावी लागणार आहे. तसेच होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहक दुकानदारांशी संपर्क साधून रात्री आठपर्यंत सामान मागवू शकणार आहे.

तसेच आता रेशन दुकानेही सकाळी ७ ते ११ या कालावधीच उघडी असणार आहे. यासोबतच खाजगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानेही याच कालावधीत सुरु राहणार आहे.

दरम्यान, नवीन नियमांनुसार धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, दारुची दुकाने, सर्व खाजगी कार्यालये, सलून, ब्युटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडीयम, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस या सर्व गोष्टी बंद राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर चोर, उपचाराच्या नावाखाली लुबाडतात; कॉमेडियनचं वादग्रस्त वक्तव्य
‘चाचा विधायक है हमारे’; तन्मयच्या लसीकरणानंतर फडणवीसांना केले लोकांनी ट्रोल, मीम्स होताय व्हायरल
ठाकरे सरकार किती दिवस चालणार?; अमित शहांच्या उत्तराने राजकारणात खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.