व्हा इंजिनिअर! तुम्हाला आता फिजिक्स, केमिस्ट्री मॅथ्स विषय बंधनकारक नाही; AICTE चा निर्णय

नवी दिल्ली | अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न इंजिनिअर होण्याची असतात. त्यांना इंजिनिअर म्हणून करियर करायचं असत. अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(AICTE) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवं धोरण जाहीर केलं आहे.

नव्या धोरणाच्या अंतर्गत आता बारावीच्या विद्यार्थाने मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे. या नव्या धोरणानुसार हे विषय वैकल्पिक करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयाचा अभ्यास कठीण वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा प्रश्न पडला असेल मुख्य विषय पर्यायी केल्यानंतर प्रवेशप्रक्रीया कशा पद्धतीने केली जाणार आहे. पुर्वी या मुख्य विषयातील गुणांनुसार प्रवेश दिला जात होता. परंतु आता AICTE कडून १४ विषयांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यानुसार इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयामध्ये विद्यार्थ्याला किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यामध्ये १४ विषय पुढील प्रमाणे, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेश प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता

याबाबत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी AICTE ने संपुर्ण माहितीसाठी एक हँडबुक जारी केलं आहे. दरम्यान या नव्या निर्णयाचे स्वागत काही घटकातून करण्यात येत असलं तरी काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! एमपीएससीची परीक्षा ८ दिवसातच होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
तहसीलदार म्हणून निवड झालेल्या तरुणाला करावे लागतेय शेतमजूराचे काम
…तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली की, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.