‘आई कुठ काय करते’ मालिकेत पार पडला अनघा आणि अभिचा साखरपुडा; पहा खास क्षणाचे फोटो

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांचे शुटींग हलवण्यात आले आहे. लॉकडाऊन परिस्थिती पाहता आणि मनोरंजनात खंड पडू नये यासाठी अनेकांनी आपले सेट दुसऱ्या राज्यात हलवले आहे. त्यानुसार कथेमध्ये बदलही करण्यात आले आहे.

‘ आई कुठे काय करते’ या मालिकेत देशमुख कुटुंब सध्या गावी गेलेलं पाहायला मिळतंय. त्यांच्या गावी जाण्यामुळे अनिरुद्ध आणि अरुंधती जवळ येताना दिसतीये. अनिरुद्धला अरुंधतीला तसे बोलूनही दाखवतो परंतु ती साफ नकार देते. त्यात भरीस भर म्हणजे संजनाही त्यांच्या गावी पोहचली आहे.

संजनाला गावी बघून सगळ्यांचे चेहरे पडतात. कोणालाही ती गावी आलेली पसंद नाही. तर आजी तिला चांगलीच खड्सावते आणि परत जाण्यास सांगते. परंतु गावाबाहेत दरड कोसळी या कारणाने तिचे जाने रद्द होते. ती तिच्या बोलण्यातून सतत तिच्या बोलण्यातून सतत तीच आणि अनिरुद्धच लग्न होणार आहे असे दाखवून देते.

लवकरच मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या मुलागा म्हणजेच अभिचा साखरपुडा होणार आहे. अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याचा सोहळा नुकताच चित्रित झाला असून या सोहळ्याचे काही क्षणाचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. साखरपुड्याच्या क्षणी गौरी, यश आणि ईशा यांनी नृत्य सादर केले आहे. तर त्यांच्यासोबत अभि आणि अनघा यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतो आहे.

‘आई कुठे काय करते’ च्या येत्या काही भागात गावाकडची मजा, साखरपुडा सोहळा आणि त्या सबंधीची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. तसेच लवकरच देशमुख कुटुंबात अनघाचे आगमन होणार हे स्पष्ट होतंय. तर संजना देखील मनात तिच्या आणि अनिरुद्धच्या लग्नाला घेऊन प्रचंड उत्साहात आहे.

लवकरच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला नवीन वळण मिळालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजी आणि आप्पा संजनाला आपली सून म्हणून स्वीकारणार का? यश आणि ईशा आई सोबत घर सोडून जाणार का? अश्या अनेक गोष्टींचे उलगडे येत्या भागात आपल्यला पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा-

अरे देवा देवा.. कोरोना लस घेताच अभिनेत्री अंकिता लोखंडेची नाटकं सुरू; पहा व्हिडिओ

मुंबई इंडियन्स पाठविणार त्यांच्या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्सने; बाकीच्या संघाना पण देऊ केली मदत

मुंबई इंडियन्सने जिंकले सगळ्यांचे मन, विदेशी खेळाडूंना घरी पाठवण्यासाठी केली ही सोय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.